नाटो देशांनी दोन कामं केल्यास रशिया यूक्रेन युद्ध लवकर थांबेल : डोनाल्ड ट्रम्प
वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली आहे. रशियावरील निर्बंध आणखी वाढवण्यासंदर्भात डोनाल्ड ट्रम्प यांनी इशारा दिला आहे. रशियावर आणखी कठोर निर्बंध लादण्यास तयार आहे. मात्र, त्यासाठी एक अट आहे, असं डोनाल्ड ट्रम्प नाटो सदस्य देशांना म्हणाले. नाटोच्या सर्व सदस्य देशांनी रशियाकडून तेल खरेदी थांबवावी, असं ट्रम्प म्हणाले. नाटो देशांनी त्यांच्या पातळीवर रशियावर निर्बंध लादावेत, असंही ते म्हणाले. ट्रम्प यांनी याबाबतची पोस्ट ट्रथ सोशलवर शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी एक पत्र नाटो देशांसाठी आणि जगासाठी शेअर केलं आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढं म्हटलं की नाटो देशांनी चीनवर 50 ते 100 टक्क्यांपर्यंत टॅरिफ लादावं. यामुळं रशिया आणि यूक्रेन युद्ध थांबवण्यात मदत होईल. चीनचा रशियावर मोठा प्रभाव आहे. जर नाटोनं असं केलं तर रशिया यूक्रेन युद्ध लवकर संपू शकते.
ट्रम्प हे किनारपट्टी देश आहेत
डोनाल्ड ट्रम्प यांनी नाटो देशांनी रशियाकडून तेल खरेदी करणं हैराण करणारं असल्याचं म्हटलं. याबाबत त्यांनी नाराजी देखील व्यक्त केली आहे. रशियाकडून तेल खरेदी करत असल्यानं वाटाघाटी करण्याची नाटोची क्षमता कमजोर होते. यूरोपियन कमिशन लवकरच रशियावर 19 व्या फेरीचे निर्बंध लादणार आहे. मात्र, हंगेरी आणि स्लोवाकिया यासारखे काही देश रशियाकडून तेल खरेदी करत आहेत. फ्रान्स आणि जर्मनी यांनी यूरोपियन कमिशननं रशियाच्या तेल कंपन्या आणि त्यांच्याकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांबाबत कठोर धोरण राबवावं अशी भूमिका घेतली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाकडून नुकत्याच यूक्रेनवर झालेल्या सर्वात मोठ्या हवाई हल्ल्यानंतर निर्बंध लादण्याची धमकी दिली होती. गेल्या आठवड्यात यूक्रेनमध्ये 7118 जणांना जीव गमवावा लागल्याचा उल्लेख देखील ट्रम्प यांनी केला आहे. नाटो देशांनी रशियाकडून तेल खरेदी थांबवली, चीनवर निर्बंध लादले तर रशिया यूक्रेन युद्ध लवकर थांबेल, असं ट्रम्प म्हणाले. नाटो देशांनी साथ दिली तर रशियावर निर्बंध लादण्यास तयार असल्याचं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.
नाटोनं माझ्या सूचना ऐकल्या तर यूक्रेन-रशिया युद्ध लवकर संपेल, अनेकांचा जीव वाचेल, असंही ते म्हणाले. नाटो तसं करणार नसेल तर ते माझा वेळ वाया घालवत आहेत. त्यासोबत अमेरिकेचा पैसा देखील वाया घालवत आहेत, असं ट्रम्प म्हणाले आहेत.
आणखी वाचा
Comments are closed.