Donald Trump Shooting – डोनाल्ड ट्रम्प यांच्या डिनर पार्टीवेळी गोळीबार; हल्लेखोराचा फोटो व्हायरल, इराण संघर्षाशी संबंध?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या उपस्थितीत पार पडणाऱ्या व्हाइट हाउस कॉरेस्पोंडेंट्स डिनर कार्यक्रमात शनिवारी रात्री गोळीबाराची खळबळजनक घटना घडली. गोळीबाराचा आवाज आल्यानंतर ट्रम्प आणि इतर सहकाऱ्यांना तातडीने बाहेर काढण्यात आले. या घटनेनंतर ट्रम्प यांनी स्वत: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘ट्रुथ सोशल’वर ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचा पहिला फोटो आणि व्हिडीओ शेअर केला आहे.

वॉशिंग्टन हिल्टनमधील बॉलरूममध्ये नर्ड प्रोम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऐतिहासिक डिनरचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एका हल्लेखोराने सुरक्षा चेकपॉईंट तोडून आत घुसण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा रक्षकांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता त्याने गोळीबार केला. या चकमकीत सिक्रेट सर्व्हिसचा एक अधिकारी जखमी झाला आहे. बुलेटप्रूफ जॅकेटमुळे त्याचे प्राण वाचले आहेत. यानंतर सिक्रेट सर्व्हिसने हल्लेखोराला बेड्या ठोकल्या.

हल्लेखोराची ओळखही पटली असून त्याचे नाव कोल थॉमस एलन (वय – 31) असून तो पेशाने शिक्षक आहे. आरोपी मूळचा कॅलिफोर्नियातील टोरन्स येथील रहिवासी असल्याची माहितीही ‘असोसिएटेड प्रेस’ने दिली आहे.

ट्रम्प यांची प्रतिक्रिया

गोळीबाराच्या घटनेनंतर काही तासांनी डोनाल्ड ट्रम्प यांनी देशाला संबोधित केले. आरोपीकडे अनेक घातक शस्त्र होती. ही घटना अनपेक्षित होती, पण आरोपी हा एकटा हल्ला करणारा आणि डोके फिरलेला माणूस होता, असे ट्रम्प म्हणाले. तसेच रिपब्लिकन नेत्यांना लक्ष्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. मी आजवरच्या हत्याकांडांचा अभ्यास केला आहे. जे लोक जगात मोठा प्रभाव पाडतात, त्यांनाच वारंवार लक्ष्य केले जाते, असेही ट्रम्प यावेळी म्हणाले.

लेट द शो गो ऑन! गोळीबारानंतर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया, सुरक्षा यंत्रणांच्या तत्परतेचे तोंडभरून कौतुक

Comments are closed.