ये डर अच्छा है! ऑपरेशन सिंदूरवेळी पाकड्यांची टरकली होती; शाहबाज शरीफ यांची कबूली

इजिप्तमध्ये सोमवारी झालेल्या गाझा शांतता परिषदेत राजनैतिक चर्चेसोबतच पाकिस्तानकडून ट्रम्प यांची खुशामत करण्यात आली. मात्र, यामुळे पाकिस्तानचेच हसे झाले असून हिंदुस्थानच्या ऑपरेशन सिंदूरवेळी त्यांनी टरकली होती. हे पुन्हा एकदा जगासमोर आले आहे. गाझा शांतता परिषदेसाठी इजिप्तच्या सुंदर शहर शर्म अल-शेखमध्ये अनेक जागतिक नेते उपस्थित होते. या परिषदेत २० हून अधिक देशांचे नेते उपस्थित होते.

या परिषदेत पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे कौतुक करत त्यांना पुन्हा एकदा नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकित करावे, असे म्हटले आहे. शाहबाज यांच्या भाषणात हिंदुस्थानच्या ऑपरेशन सिंदूरवेळी दरकली होती, हे दिसून आले. त्यांनी ७ मे रोजी झालेल्या घटनांचा उल्लेख केला. हिंदुस्थानने पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानविरुद्ध ऑपरेशन सिंदूर सुरू केले. शरीफ यांच्या विधानातून ऑपरेशन सिंदूरची भीती दिसून आली. ते म्हणाले की जर युद्धबंदी झाली नसती, तर पुढे काय घडले हे सांगण्यासाठी कोण वाचले असते, युद्धबंदी झाली नसती तर मोठा अनर्थ झाला असता, असे ते म्हणाले.

६७,००० लोकांचा मृत्यू झाल्यानंतर गाझामध्ये झालेल्या शांतता कराराबद्दल शाहबाज शरीफ ट्रम्प यांचे अभिनंदन करताना म्हणाले, “मी असे म्हणेन की पाकिस्तानने राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकित केले कारण त्यांनी आणि त्यांच्या टीमने युद्धबंदीसह जगात शांतता प्रस्थिपत करण्यासाठी मोठे योगदान दिले आहे. त्यांनी गाझामध्ये शांतता प्रस्थापित केली आणि मध्य पूर्वेत लाखो लोकांचे जीव वाचवले. ट्रम्प यांचा शांतीपुरूष असा उल्लेख करत शाहबाज यांनी ऑपरेशन सिंदूरची आठवण करून दिली आणि म्हटले की जर युद्धबंदी झाली नसती तर मोठा अनर्थ झाला असता. ऑपरेशन सिंदूरच्या रात्री भीतीदायक होत्या. त्या आठवल्या की मोठा अनर्थ अटळ होता, असे अनेकदा वाटून जाते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Comments are closed.