‘वन बिग ब्युटीफूल बिल’चे कायद्यात रुपांतर; ट्रम्प यांनी केली स्वाक्षरी, व्हाईट हाऊसमध्ये फटाक्यांची आतषबाजी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या महत्त्वकांक्षी ‘वन बिग ब्युटीफूल बिल’चे कायद्यात रुपांतर झाले आहे. शुक्रवारी डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये यावर स्वाक्षरी केली. विशेष म्हणजे याच बिलवरून ट्रम्प आणि टेस्लाचे सीईओ, उद्योजक एलन मस्क यांच्यात वादाची ठिणगी पडली होती. त्यानंतर मस्क सरकारमधून बाहेरही पडले होते.

याआधी 3 जुलै रोजी अमेरिकन काँग्रेसच्या प्रतिनिधी सभागृहामध्ये हे बिल 218 विरुद्ध 214 मतांनी मंजूर झाले होते आणि त्यानंतर ते स्वाक्षरीसाठी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे पाठवण्यात आले होते. शुक्रवारी व्हाईट हाऊसमध्ये आयोजित एका सोहळ्यावेळी ट्रम्प यांनी अध्यादेशावर स्वाक्षरी केली आणि याचे कायद्यात रुपांतर झाले. यानंतर व्हाईट हाऊसमध्ये फटाक्यांची आतषबाजी करत दिवाळी साजरी करण्यात आली.

Comments are closed.