100 टक्के टॅरिफ विधेयकावर ट्रम्प यांची स्वाक्षरी, हिंदुस्थानच्या अडचणी वाढणार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

हिंदुस्थान आणि चीनसह इतर काही देशांवर 100 टक्के टॅरिफ लावण्याच्या विधेयकावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली. हे विधेयक आता कायद्यामध्ये परिवर्तित झाल्यामुळे हिंदुस्थानच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. रशियाकडून जास्त कच्चे तेल खरेदी करणाऱ्या हिंदुस्थान आणि चीनसह हंगेरी, स्लोव्हाकिया आणि अजरबैजान या पाच देशांवर 100 टक्के टॅरिफ लावण्याचा राष्ट्राध्यक्षांना अधिकार देणारे विधेयक अमेरिकेच्या संसदेत मंजूर झाले होते.

अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी 180 दिवसांनी या यादीचा आढावा घेतील. हिंदुस्थान सध्या देशाच्या गरजेपैकी 40 टक्क्यांपेक्षा जास्त कच्चे तेल रशियाकडून खरेदी करत आहे. टॅरिफचा दबाव आल्यास इतर देशांकडून तेलखरेदी हिंदुस्थानला महागात पडू शकते. यामुळे देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढण्याचा धोका आहे.

Comments are closed.