एलॉन मस्कची गाडी रुळावरून घसरलीय; अमेरिकेत तिसरा पक्ष काढणे हा वेडेपणा, डोनाल्ड ट्रम्प यांची जहरी टीका

अमेरिकेचे अब्जाधीश उद्योजक आणि टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांनी शनिवारी नवीन राजकीय पक्षाची स्थापना केली. अमेरिकेचे राष्ट्रीय अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी पंगा घेत मस्क यांनी ‘अमेरिका पार्टी’ या नव्या पक्षाची घोषणा केली. मस्क यांनी एक्स (आधीचे ट्विटर) वर याबाबत माहिती दिली. यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी मस्क यांच्यावर जहरी टीका करत हा वेडेपणा असल्याचे म्हटले.

एलॉन मस्क यांनी अमेरिकेत तिसरा पक्ष काढणे हा वेडेपणा आहे. रिपल्बिकन पार्टी खूप यशस्वी होत आहे. अमेरिकेत द्विपक्षीय व्यवस्था असल्याने तिसऱ्या पक्षाची गरज नाही. तिसऱ्या पक्षामुळे संभ्रम निर्माण होईल. मस्कला मजा करायची असेल तर करावी, पण हा वेडेपणा आहे, अशी टीका डोनाल्ड ट्रम्प यांनी केली.

तिसऱ्या पक्षाची स्थापना करणे वेडेपणा आहे. रिपल्बिकन पार्टीला प्रचंड यश मिळाले असून डेमोक्रॅट्स पक्ष भरकटलेला आहे. पण अमेरिकेत द्विपक्षीय व्यवस्था असल्याने तिसऱ्या पक्षामुळे संभ्रम निर्माण होईल. तिसऱ्या पक्षाला कधीही यश मिळालेले नाही. ते मजा करू शकतात, पण हा वेडेपणा आहे, असे ट्रम्प म्हणाले.

एलॉन मस्कची गाडी पूर्णपणे रुळावरून घसरली आहे. मला हे पाहून वाईट वाटतेय. विशेषत: गेल्या पाच आठवड्यांपासून मस्क पूर्णपणे बेलगाम झाल्याचे ट्रम्प यांनी ट्रुथ या समाज माध्यमावर म्हटले.

ट्रम्प यांच्याशी पंगा; मस्क यांची अमेरिका पार्टी

Comments are closed.