ट्रम्प टी1 मोबाईलची साईट क्रॅश

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ऑर्गनायझेशनने नुकताच ट्रम्प टी1 नावाचा स्मार्टफोन अमेरिकेत लाँच केला. या फोनची किंमत 499 डॉलर म्हणजेच जवळपास 41 हजार रुपये आहे. या फोनची प्री-ऑर्डर बुकिंग सुरू करण्यात आली, परंतु मोबाईल बुक करताना साईट वारंवार क्रॅश होत आहे, अशा तक्रारी ग्राहकांनी केल्या आहेत. अनेक युजर्संना पेमेंट करताना 404 एरर येत आहे. एका ग्राहकाचे 100 डॉलरच्या जागी 64.70 डॉलर कापले गेले तरीसुद्धा त्याला कन्फर्मेशन मिळाले नाही. अकाऊंट लॉगिन आणि अपडेट करताना अनेकांना वेबसाईटमध्ये एरर दिसत आहे.
Comments are closed.