सोयाबीन खरेदीसाठी ट्रम्प पुन्हा दबावनीती वापरणार; लवकरच घेणार चीनच्या राष्ट्राध्यक्षांची भेट

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक देशांवर टॅरिफ लादत त्यांना अमेरिकेशी व्यापार करार करण्यास भाग पाडले आहे. तसेच अमेरिकेला हवा तसा व्यापार करार त्यांनी अनेक देशांशी केला आहे. यासाठी ट्रम्प यांनी टॅरिफचा शस्त्रासारखा वपार करत दबावनीती अवलंबली आहे. तसेच टॅरिफचा अमेरिकेलाही मोठा फटका बसणार आहे, याबाबतचा इशारा अनेक तज्ज्ञांनी दिला आहे. टॅरिफमुळे अमेरिकेतील सोयाबीन निर्यातीवर मोठा परिणाम होणार आहे. आता ट्रम्प अमेरिकेतील सोयाबीन खरेदीसाठी दबावनीती वापरत आहेत. आता ते लवकरच चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेणार आहेत.
ट्रम्प लवकरच चार आठवड्यात शी जिनपिंग यांना भेटणार आहेत. सोयाबीनच्या उत्पादनात मोठी भर पडणार आहे. त्यानंतर ते ऑक्टोबरच्या अखेरीस दक्षिण कोरियामध्ये सुरू होणाऱ्या APEC शिखर परिषदेच्या वेळी शी जिनपिंग यांना भेटतील असे डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या महिन्यात सांगितले होते. टॅरिफ युद्धानंतर अमेरिकेत सोयाबीनच्या उत्पादनात मोठी भर पडणार आहे, त्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. या वर्षाच्या सुरुवातीला वॉशिंग्टन आणि बीजिंगमध्ये एकमेकांविरुद्ध टॅरिफ युद्ध सुरू झाल्यानंतर ही पहिलीच भेट असेल.
अमेरिकन शेतकरी व्यापार युद्धांमुळे होणाऱ्या परिणामांना तोंड देत असताना, अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी संकेत दिले की ते चीनचे नेते शी जिनपिंग यांच्याशी भेटतील. यावेळी ते अमेरिकन सोयाबीन खरेदीसाठी त्यांच्यावर दबाव टाकण्याची शक्यता आहे. आपल्या देशातील सोयाबीन उत्पादकांना त्रास होत आहे कारण चीन व्यापार कारणांसाठी खरेदी करत नाही, असे ट्रम्प यांनी सोशल प्लॅटफॉर्मवर म्हटले आहे. मी चार आठवड्यांत चीनचे राष्ट्राध्यक्ष शी यांच्याशी भेटणार आहे आणि सोयाबीन हा चर्चेचा प्रमुख विषय असेल, असे त्यांनी पुढे म्हटले आहे.
Comments are closed.