डोनाल्ड ट्रम्प यांचा आक्रमपणा महागात पडतोय, अमेरिकेचं शेअर मार्केट क्रॅश, पाहा काय घडलं?

नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर आक्रमकपणे चीन, कॅनडा आणि मेक्सिकोवर आयात शुल्क लादण्याचा निर्णय घेतला. अमेरिकेनं  लादलेल्या आयात शुल्काच्या निर्णयाला या देशांनी देखील उत्तर दिल्यानं टॅरिफ वॉर वाढलं आहे. टॅरिफ वॉरमुळं अमेरिकेची अर्थव्यवस्थेत महागाई आणि मंदीचं सावट असल्यानं अमेरिकेचं स्टॉक मार्केट क्रॅश झालं आहे. टेक आणि टेक क्षेत्राशी संबंधित  मेगा कॅप शेअरमध्ये  जोरादर विक्री झाल्यानं नॅस्डॅकमध्ये 2 टक्क्यांनी घसरण झाली आहे. एसअँडपी 500मध्ये  सुधारणा सुरु आहे. अमेरिकन स्टॉक मार्केट क्रॅश झालं  असून आता भारतीय बाजारावर त्याचा काय परिणाम होईल ते सोमवारी समजेल.

डाऊ जोन्स इंडस्ट्रीयल एवरेज 537.36 अंकांनी म्हणजेच 1.30 टक्क्यांनी घसरुन 40813.57 अंकांवर बंद झाला.  एसअँडपी 500  हा निर्देशांकात 77.78 अंकांनी घसरण झाली. हा निर्देशांक 5521.52 अंकांवर बंद झाला आहे. नॅस्डॅक कम्पोझिट 345.44 अंकांनी घसरुन 17303.01 अंकांवर बंद झाला.

11 सेक्टरपैकी 10 मध्ये घसरण

एसअँडपी 500 निर्देशांकावरील 11 पैकी 10  सेक्टर्समध्ये घसरण झाली. कम्युनिकेशन सर्व्हिसेस, कंझ्युमर डिस्क्रेशनरी सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण पाहायला मिळाली. इंटेलच्य शेअरमध्ये 14.6 टक्के पाहायला मिळाली. तर अडोबच्या शेअरध्ये 13.9 टक्के घसरण झाली. डॉलर जनरलच्या शेअरमध्ये 6.3 टक्के वाढ झाली. टेस्लाचे शेअर 3 टक्क्यांनी घसरला. एनविडियाचा शेअर 0.14 टक्क्यांनी घटला. एप्पल आणि अमेझॉनच्या शेअरमध्ये देखील घसरण झाली आहे.

एसअँडपी 500 निर्देशांक 19 फेब्रुवारीला जिथं होता तिथून 10.1 टक्के घसरला आहे. 6 मार्चला नॅस्डॅकनं सुधारणा होत असल्याचं म्हटलं. 16 डिसेंबरला उच्चांकावर असलेल्या ठिकाणावरुन नॅस्डॅक सध्या 10.4 टक्के घसरला आहे. डाऊ जोन्स ट्रान्सपोर्टेशन इंडेक्स 25 नोव्हेंबरच्या उच्चांकाच्या तुलनेत 18.9 टक्क्यांनी घटला आहे.

यूरोपियन यूनियननं अमेरिकेनं स्टील आणि अॅल्यूमिनिअमवर लावलेल्या टॅरिफच्या बदल्यात व्हिस्कीवर  50 टक्के शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन वाइन आणि स्पिरिटच्या आयातीवर 200 टक्के टॅरिफ लावण्याची धमकी दिली. स्टॉक्स मध्ये घसरण होत असल्यानं अमेरिकन सरकारी बॉन्डची मागणी  वाढल्यानं यूएस ट्रेजरी यील्डमध्ये घसरण झाली.

भारताच्या बाजारावर काय परिणाम होणार?

भारतीय शेअर बाजाराला आज होळी निमित्त सुट्टी असून बाजार थेट सोमवारी सुरु होईल. त्यादिवशी बाजार कसा राहणार ते देखील पाहावं लागेल.

इतर बातम्या :

Multibagger Penny Stock: 1 लाखाचे बनले 3 कोटी, पेनी स्टॉक 2 रुपयांवरुन 900 रुपयांवर पोहोचला, गुंतवणूकदार मालामाल

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

अधिक पाहा..

Comments are closed.