EU सोबत कोणताही करार करू इच्छित नाही, 1 जूनपासून 50 टॅरिफ लादणार; ट्रम्प यांची धमकी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युरोपियन युनियन देशांवर 50 टक्के टॅरिफ लादण्याची धमकी दिली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही धमकी दिली आहे. आपल्या पोस्टमध्ये ट्रम्प म्हणाले आहेत की, “युरोपियन युनियनमधून येणाऱ्या सर्व उत्पादनांवर 50 टक्के टॅरिफ लादला जाईल, जोपर्यंत ही उत्पादने अमेरिकेत तयार केली जात नाहीत.”
डोनाल्ड ट्रम्प युरोपियन युनियन देशांवर 1 जून रोजी हा कर लागू करण्याची योजना आखत आहेत. पीटीआयच्या वृत्तानुसार, युरोपियन युनियनसोबत व्यापार करार पुढे न जाण्यामुळे ट्रम्प नाराज आहेत. युरोपियन युनियनने परस्पर संमतीने सर्व आयात शुल्क शून्यावर आणण्याचा प्रस्ताव दिला आहे, तर ट्रम्प सर्व आयातीवर 10 टक्के आयात शुल्क लादण्यावर ठाम आहेत. ओव्हल ऑफिसमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, त्यांना युरोपियन युनियनसोबत कोणताही करार करायचा नाही. जर कंपन्यांनी अमेरिकेत गुंतवणूक केली तर ते टॅरिफ टाळू शकतात.
Comments are closed.