रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यदिनी अलास्कामध्ये ट्रम्प-पुतीन भेटणार

रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या तीन वर्षापासून सुरू असलेले युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा पुढाकार घेतला आहे. डोनाल्ड ट्रम्प 15 ऑगस्ट रोजी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांची भेट घेणार आहेत. अलास्का येथे या दोन नेत्यांची भेट होणार आहे. ट्रम्प यांनी स्वत: ‘ट्रूथ सोशल’ या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवरून पुतीन यांच्यासोबतच्या भेटीची तारीख आणि ठिकाण जाहीर केले आहे.
अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष म्हणून मी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतीन पुढील शुक्रवारी, 15 ऑगस्ट 2025 रोजी अलास्का या महान राज्यामध्ये भेटणार आहोत. या भेटीबाबत अधिक माहिती आगामी काळात दिली जाईल. या विषयावर लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद, अशी पोस्ट ट्रम्प यांनी ‘ट्रूथ सोशल’वर लिहिली आहे.
Comments are closed.