“विश्वासघात केल्यास इराणचा सर्वनाश अटळ; अंतिम करार होईपर्यंत..”, युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
इराण आणि अमेरिकेमध्ये 14 दिवसांच्या युद्धविरामाचा निर्णय झाला आहे. या निर्णयानंतर आखातातील तणाव कमी होईल असे वाटत होते. मात्र इस्रायलने लेबनानवरील हल्ले सुरूच ठेवल्याने इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली. याच दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक पोस्ट करत इराणला इशारा दिला. जोपर्यंत दोन्ही देशांमध्ये अंतिम करार होत नाही तोपर्यंत अमेरिकन सैन्य इराणच्या सीमेवरून एक इंचही हटणार नाही, असे ट्रम्प म्हणाले. तसेच इराणने विश्वासघात केल्यास सर्वनाश अटळ आहे, असा निर्वाणीचा इशाराही त्यांनी दिला. ‘ट्रूथ सोशल’वर पोस्ट करत ट्रम्प यांनी हा इशारा दिला आहे.
अमेरिकेची सर्व जहाजे, विमाने, युद्धसामग्री आणि सैनिक इराणच्या चहूबाजूंनी तैनात राहतील. जर इराण कराराच्या अटींपासून मागे हटला, तर पुन्हा एकदा हल्ले सुरू होतील. हा हल्ला आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि विध्वंसक असेल, असेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर पोस्ट केले – “सर्व यूएस जहाजे, विमाने आणि सैन्ये, तसेच अतिरिक्त दारूगोळा, शस्त्रे आणि इतर कोणत्याही गोष्टीचा पूर्णपणे नाश करण्यासाठी आणि आधीच मोठ्या प्रमाणात कमकुवत झालेल्या शत्रूचा नाश करण्यासाठी, इराणमध्ये प्रवेश आणि… pic.twitter.com/nufe5e1mQp
— ANI_HindiNews (@AHindinews) 9 एप्रिल 2026
Comments are closed.