Iran US War – डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिली सर्वात भयंकर धमकी; आखातामध्ये भीषण युद्ध भडकण्याचे संकेत
आखातातील तणाव अत्यंत शिगेला पोहोचला असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर आतापर्यंतचा सर्वात मोठा लष्करी हल्ला करण्याची धमकी दिली आहे. या हल्ल्याची तयारीही पूर्ण झाली असून फक्त निर्णय घेणे बाकी असल्याचे ट्रम्प म्हणाले. त्यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे.
“आम्ही इराणवर एका महाकाय हल्ल्याचा विचार करत आहोत. हा हल्ला आजवरच्या कोणत्याही हल्ल्यापेक्षा मोठा असेल. मी या निर्णयाच्या अतिशय जवळ पोहोचलो असून आमची सर्व तयारी पूर्ण झाली आहे”, असा इशारा ट्रम्प यांनी एका मुलाखतीदरम्यान दिला. ट्रम्प यांच्या आवाहनावर इस्रायलदेखील या लष्करी कारवाईत सामील होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Comments are closed.