डोनाल्ड ट्रम्प यांचे निकटवर्तीय चार्ली किर्क यांची गोळ्या घालून हत्या, अमेरिकेत राष्ट्रीय शोक जाहीर

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जवळचे सहकारी आणि उजव्या विचारसरणीचे कार्यकर्ते चार्ली किर्क यांची गुरुवारी गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. ते विद्यापीठाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले होते. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी चार्ली किर्क यांच्या हत्येबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी स्वतः सोशल मीडिया पोस्ट शेअर करून या घटनेची माहिती दिली. झालेल्या घटनेमुळे ट्रम्प यांनी अमेरिकेत राष्ट्रीय शोक जाहीर केला आहे.

किर्क युटा व्हॅली विद्यापीठात आयोजित चर्चेत सहभागी होण्यासाठी पोहोचले होते. यादरम्यान ते एका तंबूखाली माइक धरून बोलत होते, तेव्हा अचानक एका व्यक्तीने त्यांच्यावर गोळी झाडली. गोळी किर्कच्या मानेला लागली. गोळी लागताच किर्क जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडले. त्यांना ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु अधिक रक्तस्त्राव झाल्याने, किर्क यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ अबाउटवर एक पोस्ट शेअर केली. त्यांनी लिहिले की, “महान चार्ली किर्क आता या जगात नाहीत. सर्वजण त्यांच्यावर प्रेम करतात आणि त्यांचा आदर करतात, मेलानिया आणि मी त्यांची पत्नी एरिका आणि संपूर्ण कुटुंबाप्रती शोक व्यक्त करतो.”

Comments are closed.