ट्रम्प यांचा मोबाईल आला, अॅपल आणि सॅमसंगला टक्कर

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्रम्प ऑर्गनायझेशनचे जगभरात वेगवेगळे बिझनेस आहेत. ट्रम्प यांच्या कंपनीने आता ट्रम्प मोबाइल नावाने टेलिकॉम सेक्टरमध्ये पाऊल टाकले आहे. कंपनीने एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. ट्रम्प यांच्या मोबाइलच्या नव्या कंपनीचे नाव ट्रम्प मोबाइल टी1 फोन आहे. या स्मार्टफोनची किंमत 499 डॉलर म्हणजेच जवळपास 43 हजार रुपये ठेवली आहे. हा फोन आयफोन आणि सॅमसंगला टक्कर देणार असल्याची चर्चा आहे. या फोनचा लुकसुद्धा आयफोन 16 प्रोसारखा आहे. हा फोन गुगल अँड्रॉइड इकोसिस्टमसोबत येतो. फोनला एका गोल्ड बारसारख्या डिझाईनसोबत लाँच केले आहे.
Comments are closed.