ट्रम्प यांचा हमासला अखेरचा इशारा

युद्धबंदीसाठी इस्रायलने घातलेल्या अटी धुडकावून लावणाऱ्या व इस्रायलाच अटी घालणाऱ्या हमासला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेरचा इशारा दिला आहे. इस्रायली बंदिवानांना न सोडल्यास तुमचे हाल आणखी बत्तर होतील, असे ट्रम्प यांनी ठणकावले आहे. ‘माझ्या सूचनेवरूनच इस्रायल गाझातील युद्ध थांबवायला तयार झाला आहे. आता तुमची बारी आहे. हा माझा शेवटचा इशारा आहे. पुन्हा मी सांगणार नाही. हमास ज्या मागण्या करतोय, त्या चुकीच्या आहेत, असेही ट्रम्प म्हणाले.
Comments are closed.