लाडक्या बहिणींना विरोध कराल तर घरी बसावे लागेल! फडणवीसांनी आपल्याच आमदाराला बजावले

प्रत्येक गोष्टीत ‘लाडकी बहीण’ आणू नका. लाडक्या बहिणीच्या विरोधात जाऊ नका अन्यथा तुम्हाला घरी बसावे लागेल, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांना आज विधानसभेत झापले.

गुटखा व अमली पदार्थाच्या विक्रीच्या संदर्भातील लक्षवेधी चर्चेत भाग घेताना भाजपचे औसा येथील आमदार अभिमन्यू पवार थेट लाडक्या बहिणींच्या मुद्दय़ावर घसरले. ग्रामीण भागात अवैध दारूची समस्या आहे. अवैध दारू हे लाडक्या बहिणीचे दुःख आहे. अवैध दारू विक्रीला आळा घालण्याचे निर्देश देऊनही त्याचे पालन होत नाही, असे त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणले. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संतप्त झाले आणि प्रत्येक गोष्टीत ‘लाडकी बहीण’ आणू नका. लाडक्या बहिणींच्या विरोधात जाऊ नका, घरी बसावे लागेल, असे म्हणाले.

n लाडक्या बहिणींचे पैसे दिले जातील. ही योजना सुरूच राहील. लाडक्या बहिणीची सुरक्षा महत्त्वाची आहे. राज्यातील अडीच कोटी महिलांनी ही योजना स्वीकारली आहे हे तुम्ही लक्षात ठेवा, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी अभिमन्यू पवार यांना झापले.

Comments are closed.