अफवा पसरवणाऱ्यांना सोडणार नाही, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा इशारा

पुण्यात महिला सुरक्षित नाहीत असे नॅरेटिव्ह पसरवले गेले, अशा अफवा पसरवणाऱ्यांना सोडणार नाही असा इशारा पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे.
पुण्यात एका महिलेने आपल्यावर बलात्कार झाल्याचे म्हटले होते. पण ही तक्रार खोटी निघाली. त्यावर अमितेश कुमार म्हणाले की, फक्त दोन दिवसांपूर्वी पुणे शहर पोलिसांसमोर एक घटना आली होती, ज्याचा वापर करून काही लोकांनी असं दाखवण्याचा प्रयत्न केला की पुण्यात महिला सुरक्षित नाही, कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे, असे चित्र निर्माण केले गेले. मात्र, पोलिस प्रशासनाच्या पूर्ण ताकदीने आम्ही हा प्रकार 24 तासांत उघडकीस आणला. पुणे हे देशातील सुरक्षित शहरांपैकी एक मानलं जातं, त्यामुळे अशा खोट्या गोष्टी पसरवून कोणीही पुणे शहराची बदनामी करू नये असे आवाहन करत अफवा पसरवणाऱ्यांना सोडणार नाही असेही कुमार म्हणाले.
महाराष्ट्र | डिलिव्हरी एजंट म्हणून अज्ञात व्यक्तीने पुण्यात 22 वर्षांच्या जुन्या डेटा वैज्ञानिकांच्या बलात्काराच्या प्रकरणात पुणे सीपी अमितेश कुमार म्हणतात, “असे आढळले की महिलेने खोटी तक्रार दाखल केली होती. तिच्या तक्रारीने पुणे पोलिसांची दिशाभूल केली.”
तो म्हणाला, “दोन दिवसांपूर्वी,… pic.twitter.com/sbsl9kc9ix
– वर्षे (@अनी) 6 जुलै, 2025
Comments are closed.