IPL 2026: पहिल्याच सामन्यापूर्वी आरसीबीची चिंता वाढली! तंदुरुस्त नसल्यामुळे ‘हा’ स्टार खेळाडू सलामीच्या लढतीला मुकणार

इंडियन प्रीमियर लीगच्या 19 (Indian premiere league 2026) व्या हंगामाचा थरार 28 मार्चपासून सुरू होत आहे. या हंगामातील पहिला सामना बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात रंगणार आहे. गेल्या वर्षी 18 वर्षांची प्रतीक्षा संपवून विजेतेपद मिळवल्यानंतर, आता आरसीबीचे लक्ष हे जेतेपद राखण्यावर असेल. मात्र, सलामीच्या लढतीपूर्वीच आरसीबीच्या गोटातून दोन वाईट बातम्या समोर आल्या आहेत.

गेल्या वर्षी आरसीबीला चॅम्पियन बनवण्यात ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज जोश हेजलवूडने (Josh Hazlewood) मोलाची भूमिका बजावली होती. हेजलवूड आरसीबीच्या ताफ्यात दाखल झाला असला, तरी तो अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त नाही. आरसीबीचे मुख्य प्रशिक्षक अँडी फ्लॉवर (Head Coach of RCB) यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, हेजलवूड अजूनही दुखापतीतून सावरत आहे, त्यामुळे तो हैदराबादविरुद्धच्या पहिल्या सामन्यात खेळू शकणार नाही.

हेजलवूडपाठोपाठ श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज नुवान तुषाराबाबतही (Nuvaan Tushara) आरसीबीची चिंता वाढली आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने आयपीएलमध्ये सहभागी होणाऱ्या आपल्या खेळाडूंसाठी ‘फिटनेस टेस्ट’ अनिवार्य केली होती. तुषारा ही टेस्ट पास करू शकला नाही, त्यामुळे त्याला अद्याप ‘ना हरकत प्रमाणपत्र’ (NOC) मिळालेले नाही. आता 4 ते 5 दिवसांनंतर त्याची पुन्हा फिटनेस टेस्ट घेतली जाईल, त्यानंतरच तो आरसीबीच्या संघात कधी सामील होणार हे स्पष्ट होईल.

हैदराबादची तगडी फलंदाजी पाहता, आपल्या दोन मुख्य परदेशी गोलंदाजांशिवाय मैदानात उतरणे आरसीबीसाठी मोठे आव्हान ठरणार आहे.

Comments are closed.