'डबल इंजिन' सरकारने विकासाला गती दिली
पंतप्रधान मोदी यांचे वक्तव्य, कॉरिडॉरचे उद्घाटन
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्ली ते डेहराडून या नव्या आर्थिक कॉरीडॉरचे उद्घाटन करण्यात आले आहे. या कॉरीडॉरमुळे उद्योग-व्यवसायांना मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे. तसेच यामुळे दिल्ली ते डेहराडून हे अंतर अवघ्या अडीच तासांमध्ये पार करणे शक्य होणार आहे. ‘डबल इंजिन’ सरकारमुळे विकासाचा वेग वाढला आहे, असे प्रतिपादन या प्रसंगी भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. वन्य प्राणी आणि मानव यांच्यात संघर्ष निर्माण होऊ नये, अशा प्रकारे या कॉरीडॉरची रचना आली असून हे त्याचे महत्वाचे वैशिष्ट्या आहे.
या कॉरीडॉरमुळे उत्तराखंड राज्याच्या विकासाला नवी चालना मिळेल. विकास आणि कनेक्टिव्हिटी या दोन्ही दृष्टींनी या कॉरीडॉरचा उपयोग या राज्याला होणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून या कॉरीडॉरचे उद्घाटन करण्यात आले आहे, असा आवर्जून उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणात केला. भारतीय जनता पक्षप्रणित सरकारने सात वर्षांपूर्वी जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारा घटनेतील अनुच्छेद 370 निष्प्रभ केला. त्यामुळे आता संपूर्ण देशाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण पेलेली राज्यघटना लागू करणे शक्य झाले आहे. संपूर्ण देशात समान नागरी संहिता लागू केली जावी, ही अपेक्षा आपल्या घटनेत उल्लेखिलेली आहे. उत्तराखंड राज्यातील भारतीय जनता पक्ष शासनाने या राज्यात समान नागरी संहिता लागू करुन ही अपेक्षा पूर्ण केली आहे, असे मतप्रदर्शनही त्यांनी त्यांच्या या भाषणात केले आहे.
पायाभूत सुविधा ही भाग्यरेखा
भविष्य सांगणारे लोग हातावरच्या रेषा पाहून आपले भविष्य वर्तविण्याचा प्रयत्न करतात. तथापि, मी या कृतीचा अर्थ वेगळा घेतला आहे. मार्ग, महामार्ग, रेल्वेमार्ग, वायूमार्ग आणि जलमार्ग या आपल्या देशाच्या भाग्यरेषा आहेत, असे मी मानतो. गेल्या 10 वर्षांमध्ये भारताच्या या भाग्यरेषांमध्ये आमच्या सरकारने विक्रमी वाढ करुन देशाचे भवितव्य सुधारले आहे, असे प्रतिपादन त्यांनी भाषणात केले.
‘देवभूमी’ स्वच्छ ठेवा…
उत्तराखंड हे राज्य त्यात मोठ्या संख्येने असणाऱ्या देवस्थानांमुळे ‘देवभूमी’ म्हणून ओळखले जाते. ही देवभूमी स्वच्छ ठेवणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. प्लॅस्टिकच्या अनिर्बंध उपयोगामुळे पर्यावरणाचा घात होत आहे. त्यामुळे आपण सर्वांनी प्लॅस्टिकचा उपयोग कमीतकमी केला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
दिल्ली-डेहराडून कॉरीडॉर…
ड दिल्ली ते डेहराहून हे अंतर सहा तासांऐवजी अडीच तासात पार होणार
ड कॉरीडॉरच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणात उद्योग-कारखान्यांची निर्मिती
ड दिल्ली आणि उत्तराखंड राज्य यांच्यात कनेक्टिव्हिटी जास्त सोयीची होणार
ड 12 किलोमीटर लांबी उंचावरुन नेल्याने वन्य प्राण्यांचे मार्ग मोकळै राहणार
Comments are closed.