भर मैदानात नितीश राणा- दिग्वेश राठी एकमेकांशी भिडले, नॉकआउट सामन्यात झाली चकमक – VIDEO
दिल्ली प्रीमियर लीगमध्ये अरुण जेटली स्टेडियमवर एलिमिनेटर सामन्यात वेस्ट दिल्ली लायन्स आणि साऊथ दिल्ली सुपरस्टार्स यांच्यात रंगलेला सामना अक्षरशः रणांगणात बदलला. या सामन्यात दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये जोरदार वादंग झाल्याचे पाहायला मिळाले.
पहिल्यांदा वातावरण तापले तेव्हा नितीश राणा आणि दिग्वेश राठी यांच्यात शाब्दिक चकमक झाली. दिग्वेश राठीने सुरुवात केलेल्या या वादाला नितीश राणाने शेवटपर्यंत नेले. या घटनेचा व्हिडिओ DPL ने आपल्या अधिकृत ‘एक्स’ अकाउंटवर पोस्ट केला असून तो काही वेळातच व्हायरल झाला.
व्हिडिओमध्ये दिसते की, राठी रनअप घेतो पण चेंडू टाकत नाहीत, त्यामुळे नितीश चिडतो. त्यानंतर पुन्हा राठी जेव्हा गोलंदाजीसाठी येतो तेव्हा नितीश क्रीज सोडून बाजूला होतो. त्यानंतर दोघांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक होते.
त्याच षटकात नितीश राणाने रिव्हर्स स्वीप मारत षटकार ठोकला आणि राठीला प्रत्युत्तर दिले. त्यानंतर नितीशने आपल्या अंदाजात सेलिब्रेशन केले, जे राठीला आवडले नाही आणि दोन्ही खेळाडू मैदानात भिडले.
हे सर्व येथे घडत आहे! 🔥🏏
नितीश राणा | दिगवेसिंग राठी | वेस्ट दिल्ली लायन्स | दक्षिण दिल्ली सुपरस्टारझ | #डीपीएल #डीपीएल 2025 #Adanidpl2025 #डेलही pic.twitter.com/ofdzqgholr
– दिल्ली प्रीमियर लीग टी 20 (@डेलिपल्ट 20) ऑगस्ट 29, 2025
इथवरच वाद संपला नाही. लगेचच कृष यादवला अमन भारतीच्या गोलंदाजीवर लाँग-ऑफ सीमेपलीकडे चेंडू पाठवायचा होता, पण अनमोल शर्मा यांनी त्याचा अप्रतिम झेल घेतला. त्यानंतर मैदानावर खेळाडूंच्यात धक्काबुक्की सुरू झाली. साऊथ दिल्लीचे सुमित माथुर, गोलंदाज अमन भारती आणि यादव यांच्यात तीव्र वाद झाला. परिस्थिती हाताबाहेर जाताच अधिकाऱ्यांना हस्तक्षेप करावा लागला.
सामन्याबाबत बोलायचं झालं तर, नितीश राणाच्या तुफानी शतकाच्या जोरावर वेस्ट दिल्लीने एलिमिनेटर सामना 7 विकेट्सने जिंकला. साऊथ दिल्लीने प्रथम फलंदाजी करत 201 धावा केल्या होत्या, ज्याचा पाठलाग वेस्ट दिल्लीने फक्त 17.1 षटकांत केला. नितीश राणाने केवळ 55 चेंडूत 8 चौकार आणि 15 भव्य षटकारांच्या मदतीने नाबाद 134 धावा केल्या.
Comments are closed.