इतिहास रचला! तेजस्वी दहिया ठरला दिल्ली प्रीमियर लीगमध्ये सर्वात जलद अर्धशतक झळकावणारा फलंदाज
दिल्ली प्रीमियर लीगमधील सर्वात वेगवान पन्नास: दिल्ली प्रीमियर लीग 2025 मध्ये जुनी दिल्ली 6 आणि साउथ दिल्ली सुपरस्टार्स यांच्यात 38वा सामना खेळला गेला. या सामन्यात साउथ दिल्लीच्या फलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी करत सामना जिंकला. तेजस्वी दहियाने (Tejashwi Dahiya) साउथ दिल्लीसाठी अप्रतिम फलंदाजी करत दिल्ली प्रीमियर लीगमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक झळकावले. त्याच्या या तुफानी खेळीमुळे साउथ दिल्लीला विजय मिळवता आला. (Purani Dilli 6 vs South Delhi Superstars)
तेजस्वी दहियाने साउथ दिल्लीकडून खेळताना फक्त 12 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. या कामगिरीसह तो दिल्ली प्रीमियर लीगमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. या सामन्यात तेजस्वीने 21 चेंडूत 69 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने 328.57 च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी केली. (Tejaswi Dahiya fastest fifty)
त्याने आपल्या खेळीत 9 षटकार आणि 3 चौकार मारले. तेजस्वीच्या या दमदार फलंदाजीमुळे साउथ दिल्लीला विजय मिळवता आला. तेजस्वी व्यतिरिक्त, अनमोल शर्मानेही साउथ दिल्लीसाठी 17 चेंडूत 56 धावांची नाबाद खेळी केली, ज्यात 1 चौकार आणि 8 षटकार ठोकले. (Anmol Sharma 56 runs DPL)
Comments are closed.