कृष्णा कदम यांना दादासाहेब फाळके पुरस्कार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

ग्रामीण भागातील सामाजिक व वैद्यकीय सेवाकार्य करणाऱया कदम कृष्णा वैद्यकीय मदत कक्षाचे संस्थापक कृष्णा कदम यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डी-पिटा चॅरिटेबल ट्रस्ट आणि फिल्मोरा मीडिया नेटवर्क यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित इंडियन टेलिव्हिजन अवॉर्ड या प्रतिष्ठत पुरस्कार सोहळ्यात कृष्णा कदम यांचा सन्मान करण्यात आला.

कृष्णा कदम यांनी कोरोना महामारीनंतर ग्रामीण भागातील रुग्णांना भेडसावणाऱया वैद्यकीय अडचणी दूर करण्यासाठी ‘कदम कृष्णा वैद्यकीय मदत कक्ष’ची स्थापना केली. त्यांच्या या कार्याची दखल घेत बॉलीवूड अभिनेता उल्का गुप्ता, क्रिकेटपटू सुधीश नायर, अभिजित राणे, सलीम झैदी, सम्राट सोनी यांच्या हस्ते कृष्णा कदम यांना दादासाहबे फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Comments are closed.