दहा दिवसानंतरही गूढ कायम, फक्त चर्चाच सुरू, डॉ. शिरीष वळसंगकर मृत्यूप्रकरणात आतापर्यंत नेमकं का
<पी शैली ="मजकूर-संरेखित: न्याय्य;">सोलापूर: सोलापुरातील प्रख्यात मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणात दहा दिवसानंतरही गूढ कायम आहे.या प्रकरणातील आरोपी मनीषा मानेच्या जामीनासाठी सोलापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयात अर्ज करण्यात आला आहे. या प्रकरणात अनेक चर्चा तर्क वितर्क लावले जात आहेत. डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले तरी त्यांच्याबद्दलचे गूढ अद्यापही कायम आहे. याबाबत बोलल्या जाणाऱ्या गोष्टींपैकी काय खरं आणि काय खोटं, याबद्दल संभ्रमावस्था आहे. तपास यंत्रणेकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, नक्की काय घडलं हे कधी समोर येणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. डॉक्टरांचा वारंवार अपमान व्हायचा. त्यांनी उभारलेल्या हॉस्पिटलमध्ये त्यांना ओपीडीचेच अधिकार होते, ओळखीच्या रुग्णाचे बिल कमी करण्यासाठी सांगितल्यानंतर देखील ते कमी केले जात नव्हते. त्यांच्याच रुग्णालयातील त्यांचे अधिकार कमी केल्याच्या, त्यांच्या शब्दाला किंमत नसल्याच्या, गोष्टी चर्चेत आहेत.
डॉ. शिरीष वळसंगकर त्यांचे पुत्र आणि सून हे तिघेही न्यूरोसर्जन होते. प्रत्येकजण आपापल्या रुग्णांची बिले स्वतः घेत होते. या प्रकरणात अटकेनंतर कारागृहात असलेल्या मनीषाला वेल्फेअरसंदर्भातील निर्णय होते. काही आवश्यक वस्तू लागल्या तर त्या डॉ. शिरीष सरांच्या स्वाक्षरीने मागवल्या जायच्या, अशीही चर्चा आहे. त्याचबरोबर रुग्णालयातील अधिकार सुनेला दिलेले असतानाही त्यांना डॉक्टरांचा हस्तक्षेप मान्य नसल्याच्या आणि सून व मुलाच्या अंतर्गत कलहाचा हॉस्पिलटवर परिणाम होऊ नये म्हणून डॉ. शिरीष वळसंगकरांचे येणं-जाणं वाढलं होतं. हे मुलगा आणि सुनेला मान्य नव्हते यामुळे काही वाद होत होते, अशीही चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. मात्र या सर्व गोष्टींना अधिकृत दुजोरा नाही. या फक्त चर्चाच आहेत. याचं उत्तर अधिकृतपणे पोलिसांच्या तपासानंतर बाहेर येणार आहे.
मनीषा मुसळे-मानेला अटक आणि चौकशी
डॉ. वळसंगकर यांना आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वळसंगकर यांच्या हॉस्पिटलमध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करणाऱ्या मनीषा मुसळे-माने हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकर यांनी एक चिठ्ठी लिहलेली होती, यामध्ये मनीषा मुसळे-मानेच्या नावाचा उल्लेख असल्याची माहिती समोर आल्यानंतर तिला ताब्यात घेऊन तिची चौकशी करण्यात आली, त्यानंतर आता या महिलेला सध्या 9 मे पर्यंत न्यायालयीन कोठडीत आहे. मनीषाला यापूर्वी पाच दिवस पोलिस कोठडी सुनावलेली आहे, त्यामुळे तिच्यापुरता प्राथमिक तपास संपलेला असल्याचे दिसून येते. त्याचबरोबर डॉ. वळसंगकर यांच्या मुलाची आणि सुनेची देखील याप्रकरणी चौकशी केली आहे.
Comments are closed.