डॉ. वळसंगकर प्रकरणात नवा ट्विस्ट! डॉ. सोनाली वडिलांसह गायब? दोघेही बेपत्ता, परदेशात गेल्याची चर
<पी शैली ="मजकूर-संरेखित: न्याय्य;">सोलापूर: सोलापुरातील प्रसिद्ध न्युरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणात नाट्यमय घडामोडी थांबण्याची चिन्हे दिसत नाहीयेत. एकीकडे वळसंगकरांच्या आत्महत्येमागील ठोस कारण अद्याप समोर आलेलं नाही, अशातच अनेक तर्क वितर्क सुरू आहेत. या दरम्यान डॉ. शिरीष वळसंगकर यांची सून डॉ. सोनाली आणि त्यांचे वडील डॉ. दिलीप जोशी गेल्या दोन दिवसांपासून गायब असल्याची चर्चा हॉस्पिटलमध्ये रंगली आहे. ते दोघे नेमकं कुठे गेले याची कोणालाच माहिती नाही. डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या सून डॉ. सोनाली वळसंगकर परदेशात गेल्याची चर्चा सुरू आहे.
डॉ. सोनाली ह्या परदेशात गेल्याची चर्चा
डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणी हॉस्पिटलच्या प्रशासकीय अधिकारी मनीषा माने हिच्या विरोधात गुन्हा दाखल आहे. तर डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणात कुटुंबियांचे जबाब देखील या आधीच पोलिसांनी नोंदवले आहेत. या प्रकरणाचा अद्याप उलगडा झालेला नसताना डॉ. सोनाली ह्या परदेशात गेल्याची चर्चा आहे. मात्र, या चर्चांना पोलिसांनी कोणताही अधिकृत दुजोरा दिलेला नाही. डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येनंतर एकापाठोपाठ एक धक्कादायक घडामोडी घडत आहेत. मात्र, या प्रकरणाच्या तपास अद्याप पुर्ण झालेला नाही. वळसंगकर यांच्या आत्महत्येप्रकरणी हॉस्पिटलची संशयित कर्मचारी मनीषा मुसळे-माने हिला अटक झाली होती. मुलगा डॉ. आश्विन आणि सून डॉ. सोनाली यांची चौकशी करण्यात आली आहे, डॉ. शिरीष यांनी लिहिलेल्या चिठ्ठीवरून तपास सुरू आहे.
दरम्यान वळसंगकर यांची सून डॉ. सोनाली आणि त्यांचे वडील डॉ. दिलीप जोशी यांनी दोन दिवसांपासून सोलापूर सोडल्याची चर्चा आहे. दोघे भारत सोडून गेल्याचीही दबक्या आवाजात कर्मचार्यांमध्ये चर्चा आहे. डॉ. दिलीप जोशी यांचा मुलगा अमेरिकेमध्ये आहे. त्यामुळे ते दोघे अमेरिकेला गेल्याचं बोललं जातं आहे. काहीजण सांगत आहेत. डॉ. सोनाली या आता मुंबई येथे स्थायिक होणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच ते गेले असल्याचेही काही कर्मचार्यांचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे डॉ. शोनाली या 30 मे नंतर ओपीडी पाहणार आहेत, असेही काही कर्मचार्यांकडून सांगण्यात येत आहे. या सर्व चर्चा सुरू असताना ते दोघे नेमके कुठे गेले याची कोणालाच कल्पना नाही. यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.
Comments are closed.