मल्टिवर्स – खुमासदार फँटसी

>> डॉ स्ट्रेन्ज
ख्रिसमसच्या आदल्या रात्री जर सांताक्लॉज किडनॅप झाला तर? या खुमासदार कल्पनेवर आधारित हा चित्रपट फँटसीसोबत आधुनिक तंत्रज्ञानाची खास झलक दर्शवतो.
हॉलीवूडने ख्रिसमस, सांताक्लॉज यांना डोळ्यांपुढे धरून अनेक बहारदार चित्रपटांची निर्मिती केलेली आहे. 2024 साली आलेला ‘रेड वन’ हा चित्रपटदेखील अबालवृद्धांचे मनोरंजन करणारा एक फँटसी चित्रपट आहे. या चित्रपटात आपल्याला फँटसीसोबत आधुनिक तंत्रज्ञानाची खास झलकदेखील बघता येते. ख्रिसमसच्या आदल्या रात्री जर सांताक्लॉज किडनॅप झाला तर? या खुमासदार कल्पनेवर हा चित्रपट आधारलेला आहे. सांताक्लॉजच्या भूमिकेत अनुभवी जेके सिमन्स आहे. त्याच्या अंगरक्षकाच्या भूमिकेत ड्वेन जॉन्सन अर्थात सर्वांचा आवडता द रॉक आहे आणि सांताच्या शोधात बहुमोल मदत करणारा इंटरनेट हॅकर ख्रिस व्हान्स बनलेला आहे.
लहानग्यांच्या आनंदाने आनंदी होणारा आणि खटय़ाळ नाठाळ माणसांमध्येदेखील निरागस लहान मूल लपलेले असते यावर ठाम विश्वास असणारा सांताक्लॉज लहान मुलांना, त्यांच्या पालकांना ख्रिसमसच्या आदल्या रात्री एका मॉलमध्ये भेटायला आलेला असतो. सांताच्या सुरक्षेची जबाबदारी असलेला नॉर्थ पोलचा सुरक्षाप्रमुख
कॅलम मात्र सतत वाढत असलेल्या नॉटी लिस्टमुळे आणि लोकांमध्ये वाढत चाललेल्या दुर्वतानामुळे निराश झालेला आहे व ख्रिसमसनंतर तो निवृत्त होण्याचा विचार करत आहे. मॉलमधून परत गेल्यावर आता दुसऱया दिवसाची महत्त्वाची तयारी सुरू असताना अचानक सांताक्लॉज ज्याचे कोडनेम रेड वन आहे त्याचे अपहरण होते आणि चित्रपट वेग पकडतो.
रेड वनच्या अपहरणात नकळतपणे मदत करणाऱया ख्रिस एव्हान्स अर्थात जॅकला आता श्ध्RA (श्ब्tप्दत्दुग्म्aत् ध्नेग्gप्t aह् Rाstदूग्दह Aल्tप्दग्tब्) ही रेड वनच्या संरक्षणाची जबाबदारी असलेली संस्था पकडून आणते. लहानपणापासून व्रात्य असलेल्या आणि पुराणातल्या कथांना भाकडकथा मांडणाऱया जॅकला हा मोठा धक्का असतो. अशी एखादी संघटना आहे, पुराणात ऐकलेल्या कथांमधील पात्रं खरोखर अस्तित्वात आहेत हे पाहून तो थक्क होतो. आता कॅलम आणि कोणाचाही माग काढण्यात निष्णात असलेला जॅक ही दुक्कल रेड वनच्या शोधार्थ बाहेर पडते. कथेमध्ये पुढे फारशी प्रसिद्ध नसलेली पात्रे यायला लागतात आणि कथेची खुमारी वाढायला लागते. ख्रिसमस विच अर्थात ग्रिला, रेड वनचा सावत्र भाऊ ा@ढम्पस ही पात्रे तशी आपल्याकडे फारशी प्रसिद्ध नाहीत, पण कथेच्या ओघात त्यांचा प्रवेश होतो आणि आपल्याला त्यांचीदेखील माहिती मिळते. या ख्रिसमस विचला रेड वनच्या ताकदीचा गैरवापर करून नॉटी लिस्टमध्ये नाव असलेल्या प्रत्येक व्यक्तीला शिक्षा करायची आहे आणि त्यासाठी तिने रेड वनचे अपहरण केलेले आहे. या प्रत्येक व्यक्तीसाठी एक जादूचा गोल बनवायचा आणि त्यात त्याला कैद करायचे असा तिचा मनसुबा असतो.
रेड वनच्या शोधात बाहेर पडलेल्या कॅलम आणि जॅकला अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतो. चित्रविचित्र प्राण्यांशी झुंज द्यावी लागते. कधी शक्ती तर कधी युक्तीचा उपयोग करून प्रत्येक संकटाला सामोरे जावे लागते. या सगळ्या प्रवासात कॅलम आणि जॅक दोघांनाही स्वत:ची एक वेगळी ओळख होते. आजवर आयुष्यात केलेल्या प्रवासाचा एका वेगळ्या नजरेनी आढावा घेण्याची संधी मिळते आणि दोघांत आमूलाग्र बदल घडून येतो. हा बदल, प्रवास आणि अपहरण नाटय़ अत्यंत खुमासदार पद्धतीने पडद्यावर साकार करण्यात आलेले आहे. या प्रवासाचा आनंद एकदा नक्की अनुभवा.
Comments are closed.