सागरी सुरक्षेत डीआरडीओची नवी झेप
मॅनपोर्टेबल ऑटोनॉमस अंडरवॉटर व्हेईकल्सची नवीन आवृत्ती विकसित
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
समुद्राखालील कोणताही धोका त्वरित शोधण्यासाठी डीआरडीओने मॅनपोर्टेबल ऑटोनॉमस अंडरवॉटर व्हेईकल्सची (एमपी-एयूव्ही) नवीन आवृत्ती विकसित करून सागरी सुरक्षेच्या क्षेत्रात मोठी प्रगती साधली आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) रिअल-टाइम माइन डिटेक्शनसाठी एमपी-एयूव्ही विकसित केले आहेत. एयूव्हीचे साइड स्कॅनर आणि अंडरवॉटर कॅमेरे रिअल टाइममध्ये धोकादायक वस्तू ओळखू शकणार आहे. या प्रणालीतील अंडरवॉटर अकॉस्टिक कम्युनिकेशन सिस्टम त्यांना मोहिमांदरम्यान आपापसात डेटा शेअर करण्यास सक्षम असल्यामुळे सुरक्षा यंत्रणांना नवे बळ प्राप्त होणार आहे.
एमपी-एयूव्हीचे डीप लर्निंग-आधारित अल्गोरिदम सिस्टमला विविध प्रकारचे लक्ष्य स्वायत्तपणे ओळखण्यास सक्षम करत असल्यामुळे ऑपरेटरचा वर्कलोड आणि मोहीम पूर्ण होण्याचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होणार आहे. या प्रणालीमध्ये मजबूत ध्वनिक संप्रेषण तंत्रज्ञानाचा समावेशही आहे. एमपी-एयूव्ही विशाखापट्टणम येथील डीआरडीओच्या नेव्हल सायन्स अँड टेक्नॉलॉजिकल लॅबोरेटरीने (एनएसटीएल) विकसित केले आहे. हे तंत्रज्ञान चाचण्यांमध्ये यशस्वी ठरले असून अलीकडेच बंदरात फील्ड चाचण्या घेण्यात आल्या होत्या.
Comments are closed.