Dream 11 ने बीसीसीआयसोबतचा करार मोडला; आशिया चषकात टीम इंडियाच्या जर्सीवर नवीन नाव, महत्वाची अप

ड्रीम 11 टीम इंडिया: संसदेत ऑनलाईन गेमिंगबाबत विधेयक (Online Gaming Bill 2025) मंजूर होताच अनेक गेम्सने रिअल-मनी गेम्स थांबवलेत. दरम्यान या विधेयकामुळे ड्रीम-11 (Dream 11), रमी, पोकरसारखे ऑनलाईन गेमही बंद झाले आहेत. पैशांचा समावेश असलेल्या ऑनलाईन गेमिंगमुळे लोकांचं आर्थिक नुकसान होतंय. ऑनलाईन गेमिंगमुळे काहींनी आत्महत्या केल्याचंही केंद्र सरकारने म्हटलं आहे. त्यामुळे ऑनलाईन गेमिंग बंद करण्याबाबत विधेयक मांडण्यात आले.

ऑनलाइन गेमिंग विधेयक आल्यानंतर ‘ड्रीम 11’ कंपनी चर्चेत आली आहे. विधेयक मंजूर झाल्यानंतर काही दिवसांतच ड्रीम 11 ने बीसीसीआयसोबतचा प्रायोजकत्व करार संपवला आहे. द इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, एका सूत्राने सांगितले की, ड्रीम 11 च्या अधिकाऱ्यांनी बीसीसीआयचे सीईओ हेमांग अमीन यांना स्पष्ट केले आहे की, ते हा करार पुढे चालू ठेवू शकणार नाहीत. ड्रीम 11 आणि बीसीसीआयचा 2023 रोजी करार सुरु झाला होता. हा करार 2026 पर्यंत करण्यात आला होता. परंतु आता ऑनलाईन गेमिंगबाबत विधेयकानंतर ड्रीम 11 ला मोठा फटका बसणार आहे.

आशिया चषकांत टीम इंडियाच्या जर्सीवर नवीन नाव- (New name on Team India’s jersey in Asia Cup 2025)

ड्रीम इलेव्हनने टीम इंडियाचं प्रायोजकत्व थांबवल्यानं आगामी आशिया चषकांत टीम इंडियाच्या जर्सीवर नवीन नाव दिसेल. त्यामुळे बीसीसीआय लवकरच प्रायोजकासाठी नवीन निविदा जारी करू शकते. त्यामुळे टीम इंडियाच्या जर्सीवर आता कोणत्या प्रायोजकाचं नाव झळकणार हे आगामी काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.

Dream 11 भारतातील सर्वात मोठे ऑनलाइन गेमिंग प्लॅटफॉर्म म्हणून उदयास- (स्वप्न 11 भारताचा सर्वात मोठा ऑनलाइन गेमिंग प्लॅटफॉर्म म्हणून उदयास आला आहे)

सर्वात मोठी कंपनी म्हणून उदयास आलेली ड्रीम-11 गेल्या काही वर्षांत भारतीय क्रिकेटमध्येही सक्रिय झाली होती आणि परिणामी 2023 मध्ये ड्रीम-11 ने बीसीसीआयसोबत 358 कोटी रुपयांचा करार केला. या करारामुळे ही कंपनी भारतीय क्रिकेट संघाची टायटल प्रायोजक बनली आणि तेव्हापासून टीम इंडियाच्या जर्सीवर ड्रीम-11 चे नाव लिहिले गेले आहे. हा करार 3 वर्षांसाठी होता जो 2026 मध्ये संपणार आहे. पण त्याआधीही हे विधेयक मंजूर झाल्यामुळे ड्रीम इलेव्हनने टीम इंडियाचं प्रायोजकत्व काढलं आहे.

टीम इंडियाचे आतापर्यंतचे प्रायोजक- (Team India Sponsors)

1. Sahara: 2001 ते 2013 पर्यंत प्रायोजक होते.
2. Star India: 2014 ते 2017 पर्यंत प्रायोजक होते.
3. Oppo: 2017 ते 2020 पर्यंत प्रायोजक होते.
4. Byju’s: 2019 ते 2023 पर्यंत प्रायोजक होते.
5. Dream 11- 2023 पासून आजपर्यंत….

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या बातम्या, VIDEO:

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

संबंधित बातमी:

Team India Without Sponsor : टीम इंडियाच्या जर्सीवरून Dream11 होणार गायब? आशिया कपमध्ये स्पॉन्सर शिवाय उतरायची का आली वेळ? जाणून घ्या

आणखी वाचा

Comments are closed.