ड्रीमलाइनरला पुन्हा तांत्रिक समस्यांचा सामना करावा लागतो

हाँगकाँगहून दिल्लीकडे येणारे विमान मागे परतविले

► वृत्तसंस्था / नवी दिल्ली

बोईंग 787 ‘ड्रीमलायनर’ विमानामध्ये पुन्हा तांत्रिक समस्या निर्माण होण्याचा प्रकार घडला आहे. या समस्येमुळे हाँगकाँगहून दिल्लीकडे येत असलेले विमान पुन्हा हाँगकाँगकडे परतविण्यात आले आहे. विमान हाँगकाँगला सुखरुप पोहचले असून सर्व प्रवासी सुरक्षित असल्याने चिंतेचे कारण काही, असे स्पष्ट केले गेले.

या विमानाने भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी साडेनऊ वाजता हाँगकाँगहून उ•ाण केले. मात्र, विमानात काहीतरी तांत्रिक दोष निर्माण झाल्याचे लक्षात आल्यानंतर 90 मिनिटांमध्ये विमान पुन्हा हाँगकाँगकडे वळविण्यात आले. ही माहिती उ•ाण रडारवर नोंद करण्यात आली. परत फिरल्यानंतर ते सुरक्षितरित्या हाँगकाँगच्या आंतरराष्ट्रीय विमातळावर उतरविण्यात आले. त्यानंतर त्याची सखोल तांत्रिक तपासणी करण्यात आली आहे. ही तपासणी बराच काळ चाललेली होती.

दक्षतेचा उपाय म्हणून…

या विमानात मोठी समस्या उद्भवली नव्हती. तथापि, दक्षतेचा उपाय म्हणून आणि धोका टाळण्यासाठी ते पुन्हा हाँगकाँगकडे वळविण्याचा निर्णय घेण्यात आला. आता परिस्थिती योग्य असून हे विमान पुन्हा उ•ाण करण्याच्या स्थितीत आहे. विमानातील सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित आणि सुखरुप आहेत. तसेच त्यांची योग्य ती सोय करण्यात येत आहे, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.

आणखी एका ड्रीमलायनरमध्ये समस्या

लंडनहून चेन्नईला येत असलेल्या ब्रिटीश एअरवेजच्या बोईंग 787 ड्रीमलाईनर विमानामध्येही तांत्रिक समस्या निर्माण झाल्याचे आढळून आले आहे. या विमानानेही भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 12.40 वाजता लंडनच्या हिथ्रो विमानतळावरुन चेन्नईच्या दिशेने उ•ाण केले. तथापि, दोन तासांच्या प्रवासानंतर ते पुन्हा लंडनकडे वळविण्यात आले. ते हिथ्रो विमानतळावर सुखरुप उतरले असून त्याची तपासणी करण्यात आली. या ही विमानात मोठा दोष आढळला नाही. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून तपासणी करण्यात आली.

ड्रीमलायनरसंबंधी अनेक तक्रारी

गेल्या चार ते पाच वर्षांपासून बोईंग कंपनीच्या ड्रीमलायनर विमानांसंबंधी तक्रारी केल्या जात आहेत. अनेकदा या प्रकारची विमाने अर्ध्या प्रवासावरुन मागे वळविण्यात आली आहेत. अहमदाबाद येथील भीषण दुर्घटनेनंतर या विमानांकडे अधिकच सावधानतेने पाहिले जात आहे. भारतानेही या दुर्घटनेनंतर सर्व ड्रीमलायनर विमानांच्या तांत्रिक तपासणी करण्याच्या प्रक्रियेला आरंभ केला आहे.

Comments are closed.