सुप्रसिद्ध अभिनेते मोहनलाल यांना मातृशोक, वयाच्या 90व्या वर्षी आईचं निधन

मल्याळम चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार मोहनलाल यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या आई प्रसिद्ध अभिनेत्री संतकुमारी यांचे मंगळवारी, 30 डिसेंबर रोजी कोची येथील निवासस्थानी निधन झाले. त्या 90 वर्षांच्या होत्या. गेल्या काही काळापासून त्या आजारी होत्या. त्यांच्यावर कोची येथील अमृता रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, त्यांची प्रकृती अधिक खालावल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. संतकुमारी यांच्या निधनामुळे मल्याळम चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.

मोहनलाल आपल्या आईच्या अत्यंत जवळ होते. आपल्या आयुष्यातील प्रत्येक यशाचे श्रेय ते आपल्या आईलाच देत असत. जगाच्या पाठीवर मी कुठेही असले तरी आपल्या आईशी दररोज न विसरता बोलयचो, असे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले. संतकुमारी यांना काही वर्षांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता, तेव्हापासून मोहनलाल त्यांची विशेष काळजी घेत होते. आईच्या निधनाने मोहनलाल यांना मोठा मानसिक धक्का बसला आहे.

मोहनलाल यांचे वडील विश्वनाथन नायर यांचं 2005 मध्ये निधन झालं आणि त्यांचा मोठा भाऊ प्यारीलाल यांचं 2000 मध्ये निधन झालं. यानंतर आता मोहनलाल यांच्या आईच्या निधनामुळे त्यांचे कुटुंब शोकाकुल आहे. सोशल मीडियावर चाहते आणि अनेक दिग्गज कलाकारांनी संतकुमारी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. मल्याळम सुपरस्टार ममूटी यांनीही मोहनलाल यांच्या घरी भेट देऊन त्यांचे सांत्वन केले.

Comments are closed.