प्रदर्शनाआधीच ‘दृश्यम-3’ने कमावले पाच कोटी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

‘दृश्यम’ आणि ‘दृश्यम-2’ या दोन्ही चित्रपटांच्या यशानंतर आता ‘दृश्यम-3’ हा चित्रपट येत्या 21 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तिसऱ्या भागातून पुन्हा मोहनलाल आणि जीतू जोसेफ यांची जोडी कमबॅक करत आहे. या चित्रपटाने प्रदर्शनाआधीच प्री-तिकीट सेलमध्ये आतापर्यंत 5.20 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. जगभरात चाहत्यांकडून अडव्हॉन्स बुकिंगमध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे. ‘दृश्यम-3’मध्ये मोहनलाल यांच्यासोबत मीना, अंसीबा हसन आणि एस्थर अनिल हे जॉर्ज कुट्टीच्या कुटुंबीयांच्या भूमिकेत परतणार आहेत.

Comments are closed.