चर्चगेट स्टेशनवर ड्रोन लागल्याने प्रवासी जखमी, इव्हेंट कंपनीची चौकशी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

ड्रोन लागल्याने प्रवासी जखमी झाल्याची घटना चर्चगेट रेल्वे स्थानकात घडली. त्या जखमी प्रवाशावर उपचार करण्यात आले. घडल्या प्रकरणी चर्चगेट रेल्वे पोलिसांनी एका इव्हेंट कंपनीला चौकशीसाठी बोलावले आहे.

बुधवारी रात्री चर्चगेटच्या फलाट क्रमांक 3 येथे विरारच्या दिशेने असणाऱया फलाटावर एक प्रवासी उभा होता. लोकलची वाट पाहत असणाऱया त्या प्रवाशावर ड्रोन येऊन धडकले. ड्रोनच्या धडकेत तो प्रवासी जखमी झाला. याची माहिती समजताच चर्चगेट रेल्वे पोलीस घटनास्थळी आले. चर्चगेट रेल्वे पोलिसांनी त्या प्रवाशाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. कपाळावर ड्रोन लागल्याने त्या प्रवाशाला दुखापत झाली. तसेच खूप रक्तस्रावदेखील झाला.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चर्चगेट येथे एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते, तेव्हा आयोजकांनी ड्रोनचा वापर केला होता. ऑपरेटरचे ड्रोनवरचे नियंत्रण सुटल्याने ही घटना घडली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे. कार्यक्रमाचे आयोजन करणाऱया एका कंपनीची ओळख पटली आहे. त्या कंपनीच्या संबंधित असणाऱयांना जबाब नोंदवण्यासाठी बोलावले जाणार असल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱयाने सांगितले.

Comments are closed.