मिझोराममध्ये 31 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त
आयझोल : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने मिझोरममध्ये सीमेनजीक 31 कोटीचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. या कारवाईदरम्यान एनसीबीने म्यानमारच्या एका नागरिकासमवेत चार जणांना अटक केली आहे. या कारवाईत एकूण 36 किलो मेथामफेटामाइन, एक सिंथेटिक ड्रग आणि 905 ग्रॅम हेरॉइन हस्तगत करण्यात आले आहे. या कारवाईत एनसीबीला मिझोरम पोलिसांकडून सहकार्य लाभले आहे.
Comments are closed.