बदलत्या हवामानामुळे हर्णे बंदरात सुक्या मासळीला डिमांड

बदलत्या हवामानाचा फटका मासेमारीला बसला असून गजबजलेल्या हर्णे बंदरात मासळीचा तुटवडा जाणवत आहे. दिवाळीच्या सुट्टय़ा लागल्याने खास मासे खाण्यासाठी येणाऱया पर्यटकांचा हिरमोड होत आहे. मासळी बाजारात ओल्या मासळीचा तुटवडा असल्याने नाइलाजास्तव पर्यटकांना सुक्या मासळीला पसंती द्यावी लागत असल्याने कधी नव्हे तो सुक्या मासळीला डिमांड आल्याचे चित्र आहे. दीपावलीच्या सुट्टय़ा सुरू असल्याने गेल्या चार-पाच दिवसांपासून दापोलीतील सर्वच बिचवर पर्यटक मोठय़ा संख्येने दाखल झाले आहेत. त्यामुळे पर्यटन व्यवसायाला सुगीचे दिवस आले आहेत. त्यात बहुतांश पर्यटक मासे खरेदी करण्यासाठी हर्णे बंदरावर येत असून सध्या वातावरणातील बदलामुळे मासेमारी बोटी किनाऱयाला लागल्यामुळे ताज्या मासळीचा पुरवठा रोडावला आहे.

Comments are closed.