दुबईतील परिवाराची अनोखी भक्ती, साईंना 24 लाखांची सोन्याची अक्षरं दान

शिर्डीच्या साईबाबांना दुबई येथील एका साईभक्त परिवाराने तब्बल 270 ग्रॅम वजनाची सोन्याची ॐ साई अक्षरं दान स्वरूपात दिली आहेत. या अक्षराची ंिकमत सुमारे 24 लाख रुपये असल्याची माहिती साईबाबा संस्थानच्यावतीने देण्यात आली. साईबाबांचे भक्त जगाच्या कानाकोपऱयात आहेत. शिर्डीच्या साईबाबांनी ‘सबका मालिक एक’ चा महामंत्र द्वारकामाईतून जगाला दिला. आपलं संपूर्ण जीवन साईबाबांनी द्वारकामाईत घालवलं. साईबाबा ज्या भिंतीला खेटून उभे राहत असत तिथे आज सर्वधर्मीय भक्त येऊन दर्शन घेतात. याच भिंतीवर लावण्यासाठी दुबई येथील एका साई भक्ताने ‘ॐ साई’ ही सोन्याची अक्षरे साई संस्थानला दान स्वरूपात दिली आहेत. भाविकाने हे दान गुप्त स्वरूपात दिले असून ही अक्षरे द्वारकामाईत मंदिरात लावण्यात आली आहेत.
Comments are closed.