Israel Iran War – दुबई विमानतळ बंद; सर्व विमान उड्डाणे अनिश्चित काळासाठी स्थगित, सुरक्षेच्या कारणस्ताव घेतला निर्णय
अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील युद्धांमुळे आखाती आणि अरब देशांमध्ये तणाव वाढला आहे. तसेच या देशात इराणने क्षेपणास्त्र डागली आहेत. त्यामुळे जगातील सर्वात जास्त उड्डाणे होणाऱ्या आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वाचे केंद्र असलेल्या दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने सर्व उड्डाणे अनिश्चित काळासाठी स्थगित केली आहेत. वाढत्या प्रादेशिक तणावाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेला प्राधान्य देण्याची गरज असल्याचे सांगून दुबई विमानतळ अधिकाऱ्यांनी दुबई आंतरराष्ट्रीय (DXB) आणि अल मकतूम आंतरराष्ट्रीय तळ (DWC) बंदची घोषणा केली.
दुबई विमानतळ पुष्टी करतो की दुबई आंतरराष्ट्रीय (DXB) आणि दुबई वर्ल्ड सेंट्रल अल मकतूम आंतरराष्ट्रीय (DWC) येथील सर्व उड्डाणे पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित करण्यात आली आहेत. प्रवाशांना सध्या विमानतळावर प्रवास न करण्याचा आणि त्यांच्या फ्लाइट्सच्या अपडेटसाठी थेट त्यांच्या संबंधित एअरलाइन्सशी संपर्क साधण्याचा सल्ला देण्यात येत आहे. आम्ही आमच्या पाहुण्यांच्या सहकार्याचे कौतुक करतो. परिस्थितीवर लक्ष ठेवून पुढील अपडेट्स दिले जातील, असे निवेदनात म्हटले आहे.
एमिरेट्ससारख्या प्रमुख विमान सेवांनी दुबईला जाणारी आणि येणारी उड्डाणे तात्पुरती बंद केली आहेत. प्रवाशांना टर्मिनल्सवर जाण्याऐवजी एअरलाइन चॅनेलद्वारे अपडेट्सचे निरीक्षण करण्याचे आवाहन केले आहे. युएई, कतार, बहरीन आणि त्यापलीकडे प्रादेशिक हवाई क्षेत्र बंद केल्याने गोंधळ वाढला आहे, युरोप, आशिया आणि आफ्रिकेतील मार्ग वळवले आहेत किंवा रद्द केले आहेत.
Comments are closed.