इराण-इस्रायल युद्ध: दुबईत अडकली भारतीय बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधू, विमानतळावरून सांगितली भयानक स्थिती

इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला आहे. कालपासून (शनिवार, २८ फेब्रुवारी) पुन्हा त्यांच्यात युद्ध सक्रिय झाले आहे. इस्राइल आणि इराण यांनी थेट एकमेकांवर मिसाईल्सने (क्षेपणास्त्र) हल्ले केले आहेत. यामुळे आसपासच्या अनेक देशांतील विमानवाहतुकीवर याचा परिणाम झाला आहे. ज्यामुळे अनेक लोक विमानतळावर अडकून आहेत. या हजारो लोकांमध्ये भारताची बॅडमिंटन स्टार पीवी सिंधू पण आहे, जी एका स्पर्धेसाठी ब्रिटनला जात होती. आता मात्र ती दुबईमध्ये अडकली आहे.
काही आठवड्यांच्या धमक्यानंतर इस्रायल-इराण या दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ले सुरू केले. यावेळी इराणने युएईला ही त्यांचा निशाना केले, तेथे अमेरिकी सैन्यांचे बेस (तळ) आहे. यामुळे दुबईवरही मिसाईल्सने हल्ले केले, ते युएईच्या सैन्यांनी उद्ध्वस्त केले. या संपूर्ण स्थितीमुळे दुबई विमानतळ बंद करण्यात आले. हे ठिकाण जगातील सर्वात व्यस्त विमानतळ असून ते अचानक बंद पडल्याने वेगवेगळ्या देशांचे हजारो नागरिक तेथे अडकून पडले आहेत. यामध्ये सिंधूही असून ती ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशीपसाठी ब्रिटेनच्या बर्मिंघमला जात होती. तिने तिच्या एक्सच्या अकाऊंटवरून तेथील परिस्थितीची माहिती दिली आहे.
सिंधूने नुकतेच काही तासापूर्वी तेथील अपडेट दिली आहे. त्यामध्ये तिने म्हटले, ” ही परीक्षा सुरूच आहे आणि परिस्थिती दिवसेंदिवस अधिक भयावह होत चालली आहे. काही तासांपूर्वी, विमानतळावर आम्ही जिथे अडकलो होतो तिथून जवळच एक स्फोट झाला. माझा प्रशिक्षक धूर आणि ढिगाऱ्याच्या अगदी जवळ असल्याने त्याला त्या भागातून लवकर पळून जावे लागले. तो आमच्या सर्वांसाठी अत्यंत तणावपूर्ण आणि भयावह क्षण होता.”
“दुबई विमानतळावरील कर्मचाऱ्यांच्या आणि दुबई अधिकाऱ्यांच्या अथक प्रयत्नांमुळे आम्ही सर्वजण आता सुरक्षित आहोत आणि अधिक सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. आम्हाला सुरक्षित ठेवण्यात मदत करण्यासाठी अविश्वसनीय पाठिंब्याबद्दल आणि सतत मदत केल्याबद्दल दुबईतील भारतीय उच्चायुक्तालयाचे देखील विशेष आभार. सध्या, आम्ही परिस्थिती निवळण्याची वाट पाहत असताना थोडी विश्रांती घेण्याचा आणि आशेवर टिकून राहण्याचा प्रयत्न करत आहोत,” असेही पुढे सिंधूने म्हटले आहे.
या हल्ल्यांचा भारतावरही परिणाम झाला आहे. चेन्नई आणि बेंगलोर विमानतळांवरून जाणारी अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली आहे.
Comments are closed.