वीजबील थकीत असल्याने पंचायत समिती अंधारात, महावितरणची मोठी कारवाई

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

सात महिन्याचं वीज बिल न भरल्याने महावितरण ने वरोरा शहरातील पंचायत समितीची वीज खंडित केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 51 हजार 580 रुपये इतके वीज बिल थकीत आहे. वारंवार सूचना देऊनही बिलाची रक्कम न भरल्याने महावितरणने अखेर कठोर कारवाई करत वीज पुरवठा खंडित केला.

मार्च एंडिंगच्या तोंडावर झालेल्या या कारवाईमुळे संपूर्ण कार्यालयीन कामकाज ठप्प झाले आहे. वीज नसल्यामुळे संगणकाधारित सर्व कामे पूर्णपणे बंद पडली आहेत. ऑनलाइन सेवा, विविध शासकीय योजनांचे कामकाज, कागदपत्रांची पडताळणी, निधी वितरण आणि अहवाल सादरीकरण यासारखी महत्त्वाची कामे ठप्प झाली आहेत. विशेष म्हणजे, आर्थिक वर्षाच्या अखेरीस असलेली कामांची गर्दी लक्षात घेता ही परिस्थिती प्रशासनासाठी मोठे संकट ठरत आहे. या घटनेचा थेट परिणाम सर्वसामान्य नागरिकांवर होत असून, पंचायत समितीत कामासाठी येणाऱ्या नागरिकांना ताटकळत बसावे लागत आहे. फंड नसल्याने वीजबिल भरण्यात आले नाही फंड आला की वीजबील भरू अस पंचायत समिती चे सह गट विकास अधिकारी यांनी सांगितले.

Comments are closed.