Due to the efforts of Dr. Parinay Phuke, the Gowari community is now in the flow of development


नागपूर : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज (29 एप्रिल) विशेष मागास प्रवर्गातील गोवारी समाजासाठी स्वतंत्र विकास कार्यक्रम राबवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे गोवारी समाजातील हजारो विद्यार्थी, महिला, बेरोजगार युवक व नागरिकांना थेट लाभ होणार असल्याचे भाजपचे आमदार डॉ. परिणय फुके यांनी सांगितले. गोवारी समाजाच्या समस्या गेल्या अनेक वर्षांपासून शासन दरबारी मांडत असलेल्या डॉ. फुके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले असून, या निर्णयामुळे गोवारी समाजाच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. (Due to the efforts of Dr. Parinay Phuke, the Gowari community is now in the flow of development)

या नव्या योजनेनुसार, अनुसूचित जमातींप्रमाणेच गोवारी समाजातील विद्यार्थ्यांना वसतिगृहांमध्ये प्रवेश, निवास, आहार आणि आवश्यक शैक्षणिक साहित्य मोफत पुरवले जाईल. यासोबतच शिष्यवृत्ती, निर्वाह भत्ता, औद्योगिक प्रशिक्षण संस्थांतील विद्यार्थ्यांना विद्यावेतन, अपंग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, परीक्षांमध्ये प्राविण्य मिळवणाऱ्यांसाठी प्रोत्साहनपर बक्षिसे अशा विविध योजना देखील राबविल्या जाणार आहेत.

हेही वाचा – Ajit Pawar : मुस्लिमांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासह इतर सुविधा देण्यासाठी सरकार कटिबद्ध; अजितदादांच्या उपस्थितीत बैठक

केवळ विद्यार्थ्यांसाठीच नव्हे, तर महिलांसाठी स्वयंरोजगार व उद्योजकतेला चालना देणाऱ्या योजना आणि बेरोजगार तरुणांसाठी व्यवसायासाठी अर्थसहाय्य अशा उपक्रमांचाही समावेश या कार्यक्रमात असणार आहे. या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानताना डॉ. परिणय फुके म्हणाले की, गोवारी समाजाच्या विकासासाठी महायुती सरकारने घेतलेला निर्णय अत्यंत स्वागतार्ह असून, त्यामुळे हा समाज आता खऱ्या अर्थाने विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा – Rohit Pawar : उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे आधी एकत्र तर येऊ द्या, मग…; महायुतीबाबत रोहित पवारांचं भाकीत


Edited By Rohit Patil





Source link

Comments are closed.