दिल्लीतील बॉम्बस्फोटानंतर मोठा सामना रद्द होणार का? खेळाडूंच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
10 नोव्हेंबर रोजी देशाच्या राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ एका कारमध्ये मोठा स्फोट झाला, ज्यामध्ये 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. या स्फोटाच्या वेळी जवळपास 3 इतर गाड्याही जळाल्याचे वृत्त आहे. या घटनेनंतर देशातील अनेक राज्यांना हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
ज्या ठिकाणी हा स्फोट झाला, त्या ठिकाणापासून सुमारे 2.5 किलोमीटर अंतरावर अरुण जेटली स्टेडियममध्ये रणजी ट्रॉफीचा सामना दिल्ली आणि जम्मू-काश्मीर यांच्यात सुरू आहे. त्यामुळे आता प्रश्न उपस्थित होतं आहे की, या स्फोटानंतर सामना रद्द होणार का, कारण दिल्ली हाय अलर्टवर आहे. खेळाडूंच्या सुरक्षेबाबतही चिंता व्यक्त होत आहे.
या सामन्यात आयपीएलमधील (IPL) अनेक स्टार खेळाडू खेळत आहेत, ज्यामध्ये अब्दुल समद (Abdul Samad) आणि आयुष बदोनी (Ayush Badoni) यांचाही समावेश आहे.
दिल्ली आणि जम्मू-काश्मीर यांच्यातील या सामन्याचा तिसरा दिवस संपला आहे. दिल्लीने पहिल्या डावात 211 आणि दुसऱ्या डावात 277 धावा केल्या, तर जम्मू-काश्मीरने पहिल्या डावात 310 धावा आणि दुसऱ्या डावात 55/2 अशी खेळी केली आहे. सामना जिंकण्यासाठी जम्मू-काश्मीरला अजून 124 धावांची गरज आहे.
Comments are closed.