हिंजवडीमध्ये डंपरच्या धडकेत बापलेकीची ताटातूट, लेकीचा मृत्यू, वडील जखमी, फरार डंपर चालकाला बेड्


हिंजवडी : हिंजवडी आयटी परिसरात अवजड वाहनांच्या अपघातांचे सत्र सुरूच आहे. काल (सोमवारी दि.१७) दुपारी डम्परच्या धडकेत चाकाखाली चिरडल्याने हिंजवडीतील एका २० वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू (Hinjewadi Accident News)झाला. तन्वी सिद्धेश्वर साखरे (वय २०, रा. फ्लॅट नं. ०४, मुक्तानंद हाइट्स, गावठाण रस्ता, हिंजवडी) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. डंपरचालक अजय अंकुश ढाकणे (वय २०, रा. जांबे) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.(Hinjewadi Accident News)

मृत तरूणी तन्वी ही आपल्या वडिलांसोबत दुचाकीवरून (एमएच- १४, केव्ही- ३८८३) जांबे येथील आर-१६, कोलते पाटील, न्यू सर्कल परिसरातून मारुंजीच्या दिशेला जात होती. यावेळी पाठीमागून आलेल्या डंपरच्या धडकेत (एमएच- १४, एचयू- ९८५५) चाकाखाली येऊन तन्वीचा मृत्यू झाला. अपघातात तिचे वडील जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, तन्वी फॅशन डिझायनरचा कोर्स करत होती. तिला एक लहान बहीण असून, वडिलांचा टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. (Hinjewadi Accident News)

Hinjewadi Accident News: अपघात झाल्यानंतर डंपर चालक हा फरार झाला

आयटी नगरी हिंजवडी परिसरात वारंवार होणाऱ्या अपघातामुळे नागरिकांचा संताप वाढतोय, बेदरकारपणे चालवल्या जाणाऱ्या एका डंपर खाली वीस वर्षे तरुणी तन्वी साखरे हीचा चिरडून नाहक बळी गेला, हा अपघात झाल्यानंतर डंपर चालक हा फरार झाला होता मात्र सायंकाळच्या सुमारास फरार आरोपी अजय ढाकणे याला पोलिसांनी बेड्या ठोकले या अपघातानंतर आता हिंजवडी पोलिसांना जाग आली असून पोलिसांकडून डंपर असेल किंवा रेडमी मिक्स वाहनांवर कडक कारवाई सुरू केली आहे,वारंवार होणाऱ्या या अपघातांच्या मालिकेला हिंजवडीतील रस्ते वाहतूक कोंडी आणि कोणते निर्बंध नसलेले जड वाहनाच्या वाहतूक नेमका याला कोण कारणीभूत आहे या सगळ्या प्रश्नांकडे पिंपरी चिंचवड पोलीस दलातील वाहतूक विभागाकडून का लक्ष दिला जात नाही अशा अनेक प्रश्न या निमित्ताने उभे राहिलेत(Hinjewadi Accident News)

Hinjewadi Accident News: परिसरातील खराब रस्ते अपघातांना कारणीभूत !

प्रामुख्याने अवजड वाहनांमधून रस्त्यावर पडणारी खडी, वाळू आणि डबरमुळे अनेक दुचाकीस्वार घसरून पडत आहेत. त्यात, आयटी परिसरातील काही रस्त्यांची खड्ड्यांमुळे झालेली भयानक दुरवस्था आणि सुसाट धावणारी अवजड वाहने अपघातांना कारणीभूत ठरत आहेत. अपघाताची बातमी वाऱ्यासारखी पसरताच गावठाण रस्ता आणि साखरे कुटुंब राहत असलेल्या परिसरातील ग्रामस्थांनी गर्दी केली. स्मशानभूमीत आपल्या लेकीच्या अंत्यसंस्कारावेळी बहीण आणि आई-वडिलांनी टाहो फोडला. आई आणि बहिणीचा आक्रोश पाहून उपस्थित ग्रामस्थसुद्धा हळहळले. सर्वांचे डोळे पाणावले.

आणखी वाचा

Comments are closed.