ज्याच्या गोलंदाजीवर सलग 5 षटकार ठोकले… त्याच्याच वडिलांच्या निधनाची बातमी ऐकून नबी स्तब्ध, Vide
दुनिथ वेलॅलेज फादर डेथ एशिया कप 2025: आशिया कप 2025 दरम्यान गुरुवारी एक अतिशय दुःखद बातमी समोर आली. श्रीलंकेचा युवा गोलंदाज दुनिथ वेल्लालागे सामन्यात खेळत असतानाच त्याच्या वडिलांचे निधन झाले. ही माहिती त्याला सामन्यानंतर देण्यात आली. मैदानाबाहेर असलेल्या पत्रकारांनी जेव्हा ही गोष्ट मोहम्मद नबीला सांगितली, तेव्हा तो क्षणभर थक्क झाला. कारण, याच सामन्यात नबीने वेल्लालागेच्या एका षटकात सलग 5 षटकार ठोकले होते.
नबीची तुफानी खेळी
अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 169 धावांचा डोंगर उभारला होता. त्यात नबीने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने फक्त 22 चेंडूत 6 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने 60 धावा फटकावल्या. विशेष म्हणजे, वेल्लालागेच्या टाकलेल्या शेवटच्या षटकात नबीने एकट्याने 5 षटकार ठोकले. या षटकात तब्बल 32 धावा निघाल्या आणि वेल्लालागेच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत होती.
जेव्हा श्रीलंकेचे प्रशिक्षक सनाथ जयसुरिया आणि टीम मॅनेजरने सामन्यानंतरच वडिलांच्या निधनाविषयी डुनिथ वेलॅलेजला माहिती दिली. अचानक हृदयविकाराच्या झटक्याने दुनिथच्या वडिलांचे निधन झाले. तो 54 होता
व्हिडिओ क्रेडिट्स- धनुष्का pic.twitter.com/p01nffwlvw– निब्राझ रमझान (@निब्राझ 88 क्रिकेट) 18 सप्टेंबर, 2025
सामन्यानंतर धक्कादायक बातमी
सामना संपल्यानंतर नबी जेव्हा संघासोबत हॉटेलकडे जात होता, तेव्हा पत्रकारांनी त्याला वेल्लालागेच्या वडिलांच्या निधनाबाबत माहिती दिली. ही बातमी ऐकून नबी क्षणभर गप्पच बसला. “कधी?” असा त्याने थोड्याशा अविश्वासाने प्रश्न विचारला. त्यावर पत्रकारांनी सांगितले की, पहिली डाव संपल्यानंतर ही बातमी आली होती. दरम्यान, वडिलांच्या निधनाची बातमी समजताच वेल्लालागे तातडीने यूएईहून श्रीलंकेसाठी रवाना झाला. विशेष म्हणजे, हा सामना वेल्लालागेचा आशिया कप 2025 मधील पहिलाच सामना होता. यापूर्वी तो बांगलादेश आणि हाँगकाँगविरुद्ध खेळला नव्हता.
क्रिकेट हा एक अतिशय क्रूर खेळ आहे. जेव्हा मोहम्मद नबीने वेलालेजला पाच षटकारांवर धडक दिली तेव्हा वेलालेज वडिलांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा मृत्यू झाला. मुलासाठी किती मोठा धक्का आणि दु: ख#ASIACUP pic.twitter.com/zga0u8espk
– अदनान अब्बासी (@अदाननबबासी ०२२) 19 सप्टेंबर, 2025
श्रीलंकेच्या विजयातून बांगलादेशलाही फायदा
अफगाणिस्तानच्या 169 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेने 19व्या षटकात विजय मिळवला. या विजयामुळे केवळ श्रीलंका नव्हे तर बांगलादेशलाही सुपर-4 मध्ये प्रवेश मिळाला. सुपर-4 मधील पहिला सामना श्रीलंका विरुद्ध बांगलादेश असा होणार असून तो 20 सप्टेंबरला दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळवला जाईल.
हे ही वाचा –
Gautam Gambhir CRED Video : गौतम गंभीर ‘तो’ व्हिडिओ पाहून भडकला, सगळे ट्विट डिलीट करायला सांगितले, नेमकं काय घडलं?
आणखी वाचा
Comments are closed.