चल निघ! कॅप्टन ईशान किशनशीच भिडला गोलंदाज, व्हिडिओ व्हायरल

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६ चा हंगाम सुरू होण्यास काहीच दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे अनेक संघ तयारीला लागले आहेत, तर काही फ्रॅंचायजीना खेळाडूंच्या दुखापतीशी झुंज देत आहेत. हंगामाआधी किती तयारी झाली हे पाहण्यासाठी संघ आपापसात सराव सामने खेळत आहेत. सनरायझर्स हैद्राबादनेही शनिवारी (२२ मार्च) एक सराव सामना खेळला. त्यामध्ये गोलंदाज झीशान अन्सारीने कर्णधार ईशान किशनला बाद केल्यानंतर जी प्रतिक्रिया दिली, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
हैद्राबादच्या इंट्रा-स्क्वाडमधील सराव सामन्यात अभिषेक शर्मा, ईशान आणि नवखा खेळाडू सलील अरोरा यांनी जबरदस्त फलंदाजी केली. त्यामधील दुसऱ्या डावात ईशानने झीशानच्या एका षटकामध्ये चांगलेच शॉट्स मारले आणि २० धावा वसूल केल्या. त्याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर तो बाद झाला. त्या व्हिडिओमध्ये बाद झाल्यानंतर झीशान ईशानला तंबूकडे जाण्याचा इशारा करत आहे. तेव्हा दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली, मात्र ईशानने त्याला गंभीरतेने न घेता हसत तंबूकडे परतला.
आयपीएल २०२६ च्या हंगामासाठी हैद्राबादचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स काही सामन्यांना मुकणार आहे. त्यामुळे ईशानला नेतृत्वाची जबाबदारी सोपवली आहे. त्याने देशांतर्गत क्रिकेटमधील सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये झारखंडचे नेतृत्व केले होते. त्यामुळे तो आता आयपीएलमध्ये कशी जबाबदारी पार पाडतो, याकडे चाहत्यांचे लक्ष असणार आहे.
आयपीएल २०२५ चा हंगाम हैद्राबादसाठी निराशाजनक ठरला. त्यांनी १४ पैकी केवळ ६ सामने जिंकले आणि ७ सामने गमावले होते. त्यामध्ये अभिषेक आणि ट्रेविस हेड अपेक्षेप्रमाणे कामगिरी करु शकले नाही. तेव्हा केवळ हेनरिक क्लासेन फॉर्ममध्ये होता. त्याने १४ सामन्यात ४८७ धावा केल्या होत्या.
२०२६ च्या आयपीएलमध्ये हैद्राबादचा पहिलाच सामना २८ मार्चला गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध आहे. यामुळे नवीन कर्णधारासोबत हैद्राबाद कशी सुरूवात हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल
Comments are closed.