प्रशिक्षक गंभीर शुबमन गिलसाठी काहीही करण्यास तयार? दिल्लीमध्ये दुसऱ्या कसोटी दरम्यान मोठा खुलासा समोर!
भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) आपली मोकळीक आणि प्रामाणिकपणासाठी ओळखले जातात. आता भारत-वेस्टइंडीज (IND vs WI) कसोटी मालिकेच्या दरम्यान त्यांनी मोठं विधान केलं आहे. त्यांनी सांगितलं की, ते शुबमन गिलसाठी (Shubman gill) सर्व टीका आणि दबाव सहन करण्यास तयार आहेत.
गंभीर म्हणाले की, ते गिलला नेहमी एकच सांगतात, त्याला नेहमी पूर्ण समर्थन मिळणार आहे. गंभीर हे पाहायला उत्सुक आहेत की, कर्णधार म्हणून गिल संघाच्या कठीण परिस्थितीत कसा वागतो.
गिल, ज्याला याच वर्षी रोहित शर्माच्या निवृत्ती नंतर कसोटी संघाचं नेतृत्व दिलं होतं, आता त्याने ODI संघाचं देखील कर्णधारपद स्वीकारलं आहे. ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर तो पहिल्यांदाच वनडे सामन्यात टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. भारत-ऑस्ट्रेलिया वनडे मालिका 19 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.
प्रशिक्षक गौतम गंभीरने शुबमन गिलच्या नेतृत्वबद्दल सांगितलं, तो वनडे संघाचा कर्णधार आहे. मी पाहू इच्छितो की, टीम जर कठीण परिस्थितीत असेल तर तो कशा प्रकारे ती परिस्थिती हाताळतो. हे त्याच्या वैयक्तिक प्रदर्शनासाठी आणि टीमसाठी महत्वाचं आहे. मी नेहमी त्याला एकच सांगतो, मी नेहमी तुझं समर्थन आणि संरक्षण करणार आहे.
गौतम गंभीर पुढे म्हणाले, माझं काम म्हणजे त्याच्यावरून दबाव कमी करणे. तो जेवढं चांगलं खेळेल, ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंशी प्रामाणिक राहील आणि पारदर्शकता ठेवेल, मी त्याच्यासाठी सर्व टीका सहन करण्यास तयार आहे. हाच आदर मिळवण्याचा एकमेव मार्ग आहे.
दिल्लीमध्ये खेळल्या जाणाऱ्या वेस्टइंडीजविरुद्ध दुसऱ्या कसोटीत शुबमन गिलने (Shubman gill) नाबाद 129 धावांची पारी खेळत अनेक मोठे रेकॉर्ड मोडले. हे त्याचं कसोटी कारकिर्दीतील 10वं शतकं शतक ठरलं. या खेळीमुळे भारताला पहिल्या डावात 518 धावांपर्यंत पोहोचण्यास मदत केली.
Comments are closed.