ई-बाईक टॅक्सी सेवेला मिळाली कायदेशीर मान्यता, परिवहन विभागाकडून कडक नियम जारी

राज्यात ई-बाईक टॅक्सी सेवेला कायदेशीर मान्यता देण्यात आली आहे. रॅपिडो व उबरसारख्या अ‍ॅप-आधारित अ‍ॅग्रीगेटर्सना ई-बाईक टॅक्सीची सेवा सुरू करण्यास परवानगी मिळाली आहे. यासंदर्भात परिवहन विभागाने कडक नियम जारी केले आहेत. नवीन नियमांनुसार, केवळ इलेक्ट्रिक दुचाकींना मुभा असून पेट्रोलवर चालणाऱ्या गाड्यांना परवानगी नसेल.

ई-बाईक टॅक्सीची सेवा इतर राज्यांमध्ये आधीच सुरू झाली आहे. आता महाराष्ट्रातही या सेवेला मान्यता मिळाली आहे. आवश्यक बाबींची पूर्तता केल्यानंतर ई- बाईक टॅक्सीचा परवाना दिला जाईल, असे परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी सांगितले.

काय आहेत नियम?

  • अ‍ॅग्रीगेटर्सकडे राज्यभरात नोंदणीकृत किमान 50 इलेक्ट्रिक बाईकचा ताफा आवश्यक.
  • 1 लाख रुपये परवाना शुल्क आणि 5 लाख रुपये सुरक्षा ठेव जमा करावी लागणार.
  • मागील 7 वर्षांत चालकावर दारू पिऊन गाडी चालवल्याचा आरोप आढळला, तर त्याला बाईक टॅक्सी चालक म्हणून परवानगी नसेल.
  • प्रत्येक बाईक टॅक्सी पिवळ्या रंगाची असावी. त्यावर ‘बाईक टॅक्सी’ लिहिलेले असावे.
  • प्रवाशांना पिवळ्या रंगाचे हेल्मेट देण्यात यावेत. ते प्रत्येक प्रवासानंतर निर्जंतुकीकरण करणे आवश्यक.
  • व्यावसायिक ड्रायव्हिंग लायसन्स असलेल्या 20 ते 50 वयोगटातील लोकांनाच नियुक्त करता येईल. त्यांना पोलीस पडताळणी आणि नियमित आरोग्य तपासणी करावी लागेल.

Comments are closed.