ई-वे बिल रद्द करण्यासाठी 6 आवश्यक टिपा
ई-वे बिलं ही डिजिटल कागदपत्रे आहेत. भारतात वस्तूंच्या वाहतुकीचा तपशील नोंदविण्याकरिता त्यांचा वापर होतो. एप्रिल 2018 मध्ये लागू करण्यात आलेल्या ई-वे बिलांनी आधीपासून अस्तित्वात असलेल्या ट्रान्झिट पास सिस्टीमची जागा घेतली आहे. ज्यामुळे एकात्मिक प्रक्रिया (युनिफाईड प्रोसेस) आणि कागदरहित स्वरुपामुळे देशातील वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) व्यवस्थेच्या अंमलबजावणीचे मूल्य वाढले आहे.
रुपये 50,000 रुपयांपेक्षा अधिक किंमतीच्या वस्तू वाहतुकीसाठी ई-वे बिलं अनिवार्य आहेत. तुम्ही वस्तू विक्री किंवा वाहतुकीशी संबंधित व्यवसाय मालक असल्यास किंवा online marketplace मध्ये काम करत असल्यास या कागदपत्रांच्या बारकावे जाणून घेणे उत्तम राहील. ई-वे बिलं रद्द करण्याशी संबंधित एका महत्त्वाचा पैलूवर तुम्ही लक्ष ठेवणे आवश्यक आहे. ई-वे बिलं रद्द करताना लक्षात ठेवण्यासारख्या आवश्यक सूचनांची यादी येथे देत आहे.
1. ई-वे बिलं रद्द करण्याची कालमर्यादा समजून घ्या
ई-वे बिलं रद्द करताना लक्षात ठेवण्यासारख्या सर्वात महत्त्वाच्या बाबींपैकी एक म्हणजे तुम्हाला ई-वे बिल रद्द करण्यासाठी लागणारी 24 तासांची मुदत देण्यात येते. जर तुम्ही या या विशिष्ट कालमर्यादेत असे करण्यात अयशस्वी झालात, तर ई-वे बिल वैध राहते. त्यानंतर लेखापरीक्षण किंवा तपासणीदरम्यान विसंगती आढळल्यास संभाव्य दंड होऊ शकतो. तांत्रिक त्रुटी आणि/किंवा पोर्टल डाउनटाइम टाळण्यासाठी ई-वे बिल रद्द करण्यापूर्वी तुम्ही शेवटच्या मिनिटापर्यंत वाट पाहत नाही याची खात्री करणे देखील महत्त्वाचे ठरते. जे रद्द करण्याच्या अंतीम मुदतीच्या मार्गावर येऊ शकते.
2. रद्द करण्यापूर्वी तपशील तपासा
तुम्ही ई-वे बिलं रद्द करण्यापूर्वी बिलाचे तपशील दोनदा तपासल्याची खात्री करा. जेणेकरून तुम्ही अनवधानाने चुकीचे ई-वे बिल रद्द करणार नाही. चुकीचे ई-वे बिल रद्द झाल्यास, दस्तऐवज आणि प्रत्यक्ष वाहतुकीच्या तपशीलांमध्ये विसंगती निर्माण होईल. ज्यामुळे तुमच्या व्यवसायाची अनावश्यक छाननी होऊ शकते. एकदा ई-वे बिल रद्द झाल्यास ते पुन्हा वैध केले जाऊ शकत नाही हे देखील लक्षात ठेवा. अशी परिस्थिती उदभवल्यास तुम्हाला नवीन ई-वे बिल तयार करावे लागेल.
3. सर्व भागधारकांशी समन्वय साधा
जेव्हा तुम्ही ई-वे बिल रद्द करता, तेव्हा रद्द करण्याबाबत सर्व भागधारकांना-विशेषतः वाहतूकदारांना-कळवायला विसरू नका. या प्रक्रियेत कोणतीही हयगय झाल्यास वैध कागदपत्रांशिवाय माल पाठवला जाऊ शकतो. ज्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होऊन संभाव्य दंड होऊ शकतो.
4. रद्द करण्याचे योग्य कारण नमूद करा
जीएसटी पोर्टलवरील ई-वे बिल रद्द करताना, तुम्ही रद्द करण्याचे कारण देणे आवश्यक आहे. पारदर्शक नोंदी ठेवणे आणि ऑडिटदरम्यान समस्या टाळण्यासाठी योग्य कारण निवडणे महत्त्वाचे ठरते. ऑर्डर रद्द करणे, चुकीची माहिती नोंदवणे किंवा माल पाठवण्याच्या योजनांमधील बदल याविषयी कोणतीही संभाव्य छाननी टाळण्यासाठी ई-वे बिल रद्द करण्याचे नेमके कारण अचूकपणे टिपले पाहिजे.
5. पोर्टलवर रद्द केल्याची पुष्टी करा
ई-वे बिल रद्द करण्याविषयी अर्ज दाखल केल्यानंतर, प्रक्रिया पूर्ण झाली असे समजू नका. ई-वे बिलाची स्थिती ‘रद्द’ (कॅन्सल) अशी अद्ययावत करण्यात आली आहे; याची जीएसटी पोर्टलवर पडताळणी करा. कोणतीही सक्रिय ई-वे बिले नाहीत; जी नंतर तपासणी किंवा ऑडिटदरम्यान अनुपालन (कॉम्प्लियान्स) म्हणून चिन्हांकित केली जातील; अशी पुष्टी करण्याच्यादृष्टीने हे महत्त्वपूर्ण आहे. असे पाऊल तुमच्या व्यवसायाचे दंडांपासून संरक्षण करून अनुपालन/कॉम्प्लियान्सची स्वच्छ नोंद राखण्यास मदत करते.
6. ई-वे बिल रद्द करण्याच्या नोंदी ठेवा
जीएसटी पोर्टलवरून ई-वे रद्द करण्याचे कारण आणि पुष्टी यासह रद्द केलेल्या सर्व गोष्टींची नोंद ठेवा. ऑडिटदरम्यान या नोंदी अमूल्य आहेत. तसेच ई-वे बिलांच्या व्यवस्थापनातील अनुपालन/कॉम्प्लायन्स आणि योग्य काळजी घेतल्याचा पुरावा म्हणून काम करू शकतात. व्यवस्थित ठेवलेल्या नोंदी ऑडिटची प्रक्रिया सुलभ करतात. तसेच कर अधिकाऱ्यांनी चौकशी केल्यास सर्व आवश्यक कागदपत्रे उपलब्ध असल्याची मनःशांती देतात.
निष्कर्ष
ई-वे बिले कशी रद्द करायची हे योग्यरित्या समजून घेणे हा जीएसटीचे पालन करत असताना लॉजिस्टिकचे व्यवस्थापन करण्यात सक्षम होण्याचा अविभाज्य भाग आहे. ई-वे बिले रद्द करण्याच्या बाबतीत या सहा टिपा पाळल्याने काही सामान्य त्रुटी कमी करण्यास मदत होऊ शकते. तुमचा व्यवसाय हा छाननी आणि दंडापासून मुक्त राहील याची खात्री करण्याच्या दिशेने हे एक पाऊल असू शकते. ज्यामुळे बँका आणि NBFCsसारख्या संस्थांकडून वित्तपुरवठा करणे सोपे होऊ शकते.
Disclaimer :
Comments are closed.