रशिया 7 तीव्रतेच्या भूकंपाने हादरला; जपानला 9.9 तीव्रतेच्या भूकंपाचा इशारा, 12 मिनिटानंतर चूक उमगली अन्…

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

रशियाच्या कामचटका द्वीपकल्प 7 तीव्रतेच्या भूकंपाने हादरला आहे. शुक्रवारी दुपारी साडे तीनच्या सुमारास हा शक्तिशाली भूकंप झाला आहे. या भूकंपाचे केंद्र जमिनीखाली सुमारे 140 किलोमीटर खोल होते. रशियाच्या व्हिल्युचिन्स्क शहरापासून सुमारे 123 किलोमीटर नैऋत्येला हे केंद्र नोंदवले गेले, अशी माहिती युरोपियन-मेडिटेरेनियन सिस्मोलॉजिकल सेंटरने दिली आहे.

स्थानिक वेळेनुसार दुपारी 3.35 च्या सुमारास हे भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपानंतर त्सुनामीचा कोणताही इशारा जारी करण्यात आलेला नाही. या भूकंपामुळे त्सुनामीचा कोणताही धोका निर्माण झालेला नाही, अशी माहिती अमेरिकेच्या ‘नॅशनल त्सुनामी वॉर्निंग सेंटर’ने दिली. तसेच, या घटनेत झालेली जीवित किंवा वित्तहानीबाबतची माहिती तात्काळ उपलब्ध झालेली नाही.

Comments are closed.