आसामसह ईशान्येकडील राज्यांमध्ये भूकंप हादरा वाटला
वृत्तसंस्था/ गुवाहाटी
आसामसह ईशान्येकडील राज्यांमध्ये बुधवारी सकाळी 11:30 वाजता भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. त्याची तीव्रता भूकंपमापन यंत्रावर 5.6 रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली. आसामव्यतिरिक्त मणिपूर आणि नागालँड या राज्यांमध्येही भूकंपाचे तीव्र हादरे बसले. भूकंपामुळे आतापर्यंत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. सकाळी साडेअकराच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले तेव्हा लोक घाबरून घराबाहेर पडले. गेल्या काही दिवसात उत्तर भारतासह देशातील अनेक राज्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. तसेच गेल्या आठवड्यात दिल्लीतही भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले होते. आसाममध्ये यापूर्वी 28 फेब्रुवारीला 5.0 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला होता. या भूकंपाचे केंद्र मोरीगाव होते. त्याचा केंद्रबिंदू पृष्ठभागापासून 16 किलोमीटर खोलीवर होता.
Comments are closed.