इंडोनेशिया आणि म्यानमारमध्ये भूकंपाचे धक्के.
भारतात त्रिपुरा, मध्य प्रदेशातही सौम्य झटके
वृत्तसंस्था/ जकार्ता
इंडोनेशिया आणि म्यानमारमध्ये शनिवारी रात्री उशिरापासून रविवार सकाळपर्यंत भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, रविवारी सकाळी 5:07 वाजता इंडोनेशियामध्ये 10 किलोमीटर खोलीवर 5.2 तीव्रतेचा भूकंप झाला. यापूर्वी 3 ऑक्टोबर रोजी रात्री 11:42 वाजता म्यानमारमध्ये 4.6 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली होती. भारतात त्रिपुरा आणि मध्य प्रदेशातही भूकंपाचे धक्के जाणवले. 4 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री 12:57 वाजता त्रिपुरातील धलाई येथे 30 किलोमीटर खोलीवर 3.8 तीव्रतेचा भूकंप झाला. मध्य प्रदेशातील नरसिंगपूर येथे मध्यरात्री 1:16 वाजता 6 किलोमीटर खोलीवर 2.5 तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाल्याची माहिती देण्यात आली. या भूकंपांमध्ये कोठेही जीवितहानी किंवा मालमत्तेचे मोठे नुकसान झाल्याची नोंद झालेली नाही.
Comments are closed.