मुंबईत हॉटेलचे जेवण महागणार! खाद्यपदार्थांच्या किमतीत 15 टक्क्यांपर्यंत वाढ होणार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

900 रुपयांपर्यंत पोहोचलेले गॅस सिलिंडरचे दर, पेट्रोल आणि डिझेलने पार केलेली शंभरी, किरकोळ आणि घाऊक वाढलेल्या महागाईमुळे आधीच मेटाकुटीला आलेल्या सर्वसामान्यांना पुन्हा जोरदार झटका बसणार असून, मुंबईतील हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील जेवण आता महाग होणार आहे. मुंबईतील हॉटेलमधील खाद्यपदार्थांच्या किंमतीत तब्बल 15 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, याची अंमलबजावणी पुढच्या आठवड्यात केली जाण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या आणि हॉटेलमध्ये जेवण करणाऱया मुंबईकरांना आपला खिसा रिकामा करावा लागणार आहे.

‘इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन’ (आहार) या हॉटेलचालकांच्या संघटनेने हॉटेलमधील खाद्यपदार्थांच्या किंमतीत दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही महिन्यांत किरकोळ बाजारात भाजीपाला, धान्य आणि कडधान्यांच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. रोजचा भाजीपाला, विविध डाळी, खाद्यतेल आणि मसाले यांचे दर गगनाला भिडले आहेत. व्यावसायिक जागांचे वाढलेले भाडे, व्यावसायिक गॅस, वीज बिल, कर्मचाऱयांचे वेतन आणि वाहतूक खर्च या सर्व बाबींमध्ये एकाच वेळी वाढ झाली आहे.

चाकरमान्यांच्या खिशाला कात्री

मुंबईत कामानिमित्त रोज बाहेर पडणारे आणि बाहेर जेवणारे चाकरमानी, ऑफिस कर्मचारी, घरापासून दूर राहून शिक्षण घेणारे विद्यार्थी, घरपोच खाद्यसेवेवर (डिलिव्हरी अॅप्स) अवलंबून असलेले व्यावसायिक आणि मुंबईतील लाखो कुटुंबांच्या मासिक बजेटवर याचा थेट परिणाम होणार आहे. रोजच्या चहा-नाश्त्यापासून ते दुपार आणि रात्रीच्या थाळीपर्यंत सर्वच महाग होणार असल्याने चाकरमानी आणि विद्यार्थ्यांचे महिन्याचे बजेट यामुळे कोलमडणार आहे. ‘आहार’ या संघटनेचे मुंबई आणि परिसरात जवळपास 25 हजारांहून अधिक सदस्य, रेस्टॉरंट्स आणि बार आहेत. पुढील आठवडय़ापासून हॉटेलच्या मेन्यू कार्डमध्ये ही नवी दरवाढ टप्प्याटप्प्याने लागू केली जाणार आहे.

Comments are closed.